आरोग्य

हाय ब्लड प्रेशरला हलक्यात घ्याल तर होईल पश्चाताप

बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य समस्या असल्याचं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहीत नसतं की, ही समस्या जर कंट्रोल केली नाही तर हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो. इतकंच काय तर असेही भरपूर लोक असतात ज्यांना हेही माहीत नसतं की, ते लो बीपी किंवा हाय बीपीचे शिकार आहेत. तुम्ही सुद्धा अशा लोकांपैकी असाल तर हाय बीपीला अजिबात हलक्यात घेऊ नका. कारण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

तुम्ही हेही लक्षात घेतलं पाहिजे की, दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर सगळ्यात आधी ब्लड प्रेशर चेक करतात, ते हे काही उगाच करत नाहीत. पण त्यातील केवळ अर्ध्या लोकांनाच याची माहिती आहे आणि केवळ १२ टक्के लोकच याला कंट्रोल ठेवू शकतात. हाय ब्लड प्रेशरचा अर्थ 140/90 mmHg किंवा त्यापेक्षा अधिक रीडिंग येणं. हाय ब्लड प्रेशरची कारणं वेगवेगळी असू शकतात. ज्यात तुमची फॅमिली हिस्ट्री, लठ्ठपणा, मद्यसेवन, धुम्रपान, अनहेल्दी आहार आणि फिजिकल अ‍ॅक्टिविटी कमी करणे यांचा समावेश आहे.

हाय ब्लड प्रेशरनं धोका

एक्सपर्ट सांगतात की, हाय ब्लड प्रेशर हा आजारा सायलेंट किलर मानला जातो. त्यामुळे हा जास्त घातक आहे. हाय बीपीमुळे शरीरात हळूहळू नुकसान होत. पुढे जाऊन ब्रेन स्ट्रोक, हार्ट अ‍ॅटॅक, स्ट्रोक, किडनी फेल, पेरिफेरल वस्कुर डिसीज आणि दृष्टी जाणे अशा गंभीर समस्या होऊ शकतात. अनकंट्रोल हायपरटेंशनमुळे मेंदुमध्ये ब्लड क्लॉटिंग किंवा ब्लीडिंग होण्याचा धोका वाढतो. जर नियमितपणे ब्लड प्रेशर चेक केलं तर भारतात ५० टक्के ब्रेन स्ट्रोकच्या केसेस कमी केल्या जाऊ शकतात.

किती ब्लड प्रेशर घातक

ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी सगळ्यात सोप बाब म्हणजे नियमितपणे बीपी चेक करत रहा. ३० वय ओलांडलं की तुम्ही नियमितपणे बीपी चेक केला पाहिजे. तुम्ही याची मशीन घरी सुद्धा आणू शकता. नॉर्मल ब्लड प्रेशर 120 / 80 mmHg, बॉर्डर लाइन 120–139 / 80–89 mmHg बीपी स्टेज- 1 140–159 / 90–99 mmHg, बीपी स्टेज- 2 160–179 / 100–109 mmHg, बीपी स्टेज- 3 180+ / 110+ mmHg आहे.

हाय ब्लड प्रेशर कसं कंट्रोल कराल

वयाची तिशी ओलांडली की, सगळ्यांनी ब्लड प्रेशरकडे अजिबात कानाडोळा करू नये. यासाठी रोज ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. नियमितपणे वेगवेगळी फळं आणि भाज्या खाव्यात. सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट, तंबाखू आणि मद्यसेवन टाळलं पाहिजे. औषधं वेळेवर खाल्ली पाहिजे. फिजिकल अ‍ॅक्टिविटी नियमित केली पाहिजे. या गोष्टींना ब्लड प्रेशर कंट्रोल केलं जाऊ शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

3 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

4 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

19 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

19 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

1 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

1 दिवस ago