आरोग्य

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात

पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे, केस आणि शरीर या सर्व महत्त्वाच्या कार्यांसाठी पाणी आवश्यक आहे. शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून तज्ज्ञ पाणी पिण्य़ाचा सल्ला देतात. पण पाणी पिण्याची देखील ठराविक वेळ असते. पाणी पिताना आपल्याकडून बरेच नकळत चुका घडतात. ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. आपल्या शरीरात सुमारे ६५ टक्के पाणी असते. हे प्रमाण वय, लिंग, उंची, वजन आणि शारीरिक हालचालीं नुसार बदलते. त्यामुळे पाणी पिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? कोणत्या गोष्टी टाळाव्या? पाहा.

अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा

बहुतांश लोक अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात. परंतु याचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे पोटाचे विकारही वाढतात. अन्न व्यवस्थित पचत नाही. अशावेळी पचन नीट न झाल्याने शरीराला पोषक तत्वे पूर्णपणे मिळत नाही.

उभं राहून पाणी पिणे

वडीलधाऱ्यांनी आपल्याला उभं राहून पाणी पिणे म्हणजे आरोग्यासाठी घातक असा सल्ला नक्कीच दिला असेल. यामुळे पचन क्रियेवर वाईट परिणाम होतोच पण नसांवरही ताण पडतो. ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. यासोबतच किडनी आणि फुफ्फुसावरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे नेहमी बसून पाणी प्यावे.

एकाच वेळी भरपूर पाणी पिणे

उत्तम आरोग्यासाठी पाणी पिणे आवश्यक. परंतु, एकाच वेळी भरपूर पाणी प्यायल्याने नुकसान देखील होऊ शकते. एकाच वेळी पाणी प्यायल्याने इलेक्ट्रोलाइट असंतुलित होते. ज्यामुळे डोकेदुखी, थकवा आणि मळमळ होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

11 तास ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

12 तास ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

1 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

1 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

1 दिवस ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

1 दिवस ago