मुख्य बातम्या

शिरूर शहरात वारंवार वीज खंडित; रोहित्रांची क्षमता वाढविण्याची नागरिकांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांसह व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने संताप व्यक्त केला जात असून महावितरण प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित भागातील विद्युत रोहित्रांवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे कमी व्होल्टेज, फेज जाणे आणि सतत वीज खंडित होण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. याचा परिणाम घरगुती वापरासोबतच दुकाने, दवाखाने, लिफ्ट, मोटारी आणि बाजारपेठेतील विविध उपकरणांवर होत आहे.उन्हाळ्यात वाढलेल्या विजेच्या वापरामुळे सध्याची यंत्रणा अपुरी पडत असून विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना याचा मोठा त्रास होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, परिसरातील वीज ग्राहकांनी महावितरण कार्यालयात लेखी निवेदन देत रोहित्रांची क्षमता वाढविणे, अतिरिक्त रोहित्र बसविणे आणि कमी व्होल्टेजचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी केली आहे.महावितरण प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विनित बोरा, सागर चव्हाण, राजेंद्र लोळगे आणि अन्य नागरिकांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

4 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

4 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

19 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

19 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

1 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

1 दिवस ago