आरोग्य

आजारांपासून वाचायचं असेल तर बाथरुममध्ये ठेवलेल्या या ३ टॉक्सिक वस्तू लगेचच फेका बाहेर

स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. दिवसभर आपण अनेक गोष्टी करतो, अनेक गोष्टी वापरतो. याचे शरीरावर चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम होऊ शकतात. कधीकधी काही गोष्टी निरोगी दिसतात पण त्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात म्हणून तुमच्या जीवनशैलीकडे आणि दैनंदिन सवयींकडे लक्ष देण खूप महत्त्वाच आहे.

३ महिन्यांपेक्षा जुना टूथब्रश

तुम्ही जास्तीत जास्त ३ महिने टूथब्रश वापरावा. ३ महिन्यांनंतर, टूथब्रशची ३० टक्के स्वच्छता क्षमता कमी होते आणि त्यावर बॅक्टेरिया जमा होऊ लागतात.

कमी धार असलेले रेझर ब्लेड

कमी धार असलेले रेझर ब्लेड फेकून द्या. डॉक्टरांच्या मते, त्यांचा वापर केल्यामुळे त्वचेवर जळजळ होण्याचा धोका १० पटीने वाढतो. ५ ते ७ वेळा वापरल्यानंतर तो फेकून द्यावा. अशा प्रकारे तुम्ही त्वचेचं नुकसान आणि संसर्ग टाळू शकतो.

अँटी-मायक्रोबियल माउथवॉश

तोंडातील बॅक्टेरिया मारण्यासाठी लोक अँटीमायक्रोबियल माउथवॉश वापरतात. रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, अँटी मायक्रोबियल माउथवॉश तोंडात असलेले फायदेशीर बॅक्टेरिया देखील नष्ट करू शकतात. यामुळे बॅक्टेरियांची संख्या कमी होऊ शकते.

हेल्दी ओरल टिप्स

तुमचे दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. दिवसातून दोनदा दात घासा आणि दातांमधील स्वच्छतेची देखील काळजी घ्या. साखर, कॅफिन आणि अल्कोहोल कमी करा. तसेच दातांचं नियमित चेकअप करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गुनाटमध्ये भरधाव मोटारसायकलची शाळकरी मुलाच्या सायकलला पाठीमागून धडक; बालक गंभीर जखमी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : गुनाट ते शिंदोडी रस्त्यावर भरधाव आणि निष्काळजीपणे मोटारसायकल चालविणाऱ्या चालकाने सायकलवरुन…

50 मिनिटे ago

शिरूर! मलठणमध्ये अष्टविनायक महामार्गावर कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू…

मलठण (सुनिल जिते) : अष्टविनायक महामार्गावर भरधाव वेगाने वाहन चालविणे आणि ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न दोन…

1 तास ago

‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवून मोदींना हटवण्याचे स्वप्न पाहू नका! विरोधकांना एकनाथ शिंदेंचा ठाण्यातून घणाघात

‘लोकतंत्र बचाव’च्या नावाखाली काँग्रेसकडून लोकशाहीबाबत संभ्रम; व्होट चोरीच्या आरोपांवर पुरावे देण्याचे शिंदेंचे आव्हान ठाणे :…

14 तास ago

दुष्काळात बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही; आज मदतीचा हात, उद्या शेताला पाणी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेडच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही; १०० बेडचे रुग्णालय २०० बेडचे करण्याचे निर्देश, शेतकऱ्यांना…

14 तास ago

संघर्षातून सत्तेच्या शिखरापर्यंत! जनतेच्या विश्वासातून घडलेले नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे

रिक्षाचालक ते उपमुख्यमंत्री; संघर्ष, संघटनकौशल्य, लोकसंपर्क आणि विकासाभिमुख वाटचालीचा प्रेरणादायी प्रवास मुंबई: नेतृत्व हे केवळ…

14 तास ago

डिंग्रजवाडीतून ५ लाखांचे सर्व्हे मशिन चोरीला; शिक्रापूर पोलिसांची हरियाणापर्यंत धडक!

एक आरोपी हरियाणातून, तर दुसरा विश्रांतवाडीतून जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर…

17 तास ago