आपत्ती व्यवस्थापन संघाच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय गौरव
शिंदोडी (तेजस फडके): ‘द मिलेनियर क्लब, दुबई’ यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘मिलेनियर लाईफस्टाईल अवॉर्ड’ यंदा आपत्ती व्यवस्थापन संघाचे संस्थापक/अध्यक्ष दौलत उमाजी शितोळे यांना जाहीर करण्यात आला आहे. गेल्या एक दशकाहून अधिक काळ आपत्ती व्यवस्थापन संघाच्या माध्यमातून हजारो नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या भरीव व निःस्वार्थ सेवाभावी कार्याची दखल घेत हा सन्मान आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदान करण्यात येत आहे.
शिंदोडी येथील आपत्ती व्यवस्थापन संघाने देशातील अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींमध्ये जीव धोक्यात घालून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. उत्तराखंड येथील भीषण भूस्खलनात संस्थेच्या स्वयंसेवकांनी तब्बल ४ हजारांहून अधिक लोकांचे प्राण वाचविले. तसेच २०१९ साली सांगली येथे आलेल्या महापुरात हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी संघाचे स्वयंसेवक रांत्रदिवस कार्यरत होते.
माळीण गावातील दुर्घटनेत राबविण्यात आलेल्या बचाव मोहिमेमध्ये ३०० हून अधिक लोकांचे जीव वाचविण्यात संस्थेला यश आले. याशिवाय बेवारस मृतदेहांचे सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करणे, गुन्हेगारी प्रकरणांमध्ये मृतदेह शोधण्यास प्रशासनाला मदत करणे, तसेच अनेक गुन्ह्यांच्या उकलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन संघ सातत्याने करत आहे.
आजच्या काळात वाढत्या रोड अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचविणे, प्राथमिक उपचार उपलब्ध करून देणे, तसेच अपघात टाळण्यासाठी जनजागृती व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे, अशी सामाजिक बांधिलकीची कामेही संघाच्या माध्यमातून अखंडपणे सुरु आहेत.
सन २०१२ साली स्थापन झालेला आपत्ती व्यवस्थापन संघ आज भक्कम, प्रशिक्षित व विश्वासार्ह यंत्रणेत रुपांतरित झाला आहे. भविष्यातही नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी सर्वसामान्य नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी संघाचे स्वयंसेवक प्राणाची बाजी लावून कार्यरत राहतील,असे मत यावेळी दौलत शितोळे यांनी व्यक्त केले.
या पुरस्काराचे वितरण २५ जानेवारी रोजी रॅमी डाउन टाउन हॉटेल, दुबई येथे होणार आहे. समाजासाठी निःस्वार्थपणे केलेल्या कार्याला मिळालेला हा सन्मान संघासाठी प्रेरणादायी असून, भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा देणारा ठरेल, अशी भावना आपत्ती व्यवस्थापन संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…