आरोग्य

अपूर्ण झोप वजन वाढण्यास कारणीभूत ठरते

मध्यरात्री खाणे ही आजकाल सामान्य सवय दिसू लागली आहे, पण ही सवय चांगली नाही. रात्रीच्या जेवणाच्या आणि सकाळच्या नाष्ट्याच्या वेळेत खूप अंतर असते, पण म्हणून मध्यरात्री उठून खाणे योग्य नाही व ते टाळले पाहिजे. मध्यरात्री खाण्यासाठी आपण नेहमी फ्रिज मध्ये काही मिळते का बघतो जे आपण पटकन खाऊ शकतो आणि ज्यानी आपली भूक पण भागू शकेल. असे करताना हमखास शिल्लक राहिलेले किंवा शिळे पदार्थ खातो किंवा काही तरी गोड पदार्थ जे कायम फ्रिज मध्ये ठेवलेले असते असे खातो.

ज्यांना रात्री झोप लागत नाही अशा लोकांना मध्यरात्री भूक लागते आणि अशा वेळी जंक फूड खाण्याकडे कल जास्ती असतो. हे असे धोकादायक खाण्यामुळे वजन आणि लठ्ठपणा वाढतो. अपूर्ण झोपेमुळे जंक फूड खाण्याची भूक वाढते आणि अशा धोकादायक आणि अवेळी खाण्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि असे अजून शारिरीक आजार निर्माण होतात.

मध्यरात्री खाणे टाळण्याचे मार्ग

रात्रीचे जेवण झाले की साधारण अर्ध्या तासाने दात घासा. दात घासून झाल्यावर काही खाण्याची इच्छा होत नाही, कारण नंतर परत दात घासायचा कंटाळा येतो.

जर वेळेवर झोप लागत नसेल, तर मोबाईल, टीव्ही, संगणक, लॅपटॉप यासारख्या स्क्रिन्स पासून झोपण्यापूर्वी किमान एक तास लांब राहावे. अशा स्क्रीन्स मधून येणाऱ्या किरणांमुळे झोप लागत नाही.

अगदी थोडे पाणी प्या. बऱ्याच वेळा आपण आपली भूक पाणी पिऊन देखील शमवू शकतो.

शक्यतो अशी भूक मानसिक असते. कटाक्षाने खाणे टाळा. प्रयत्नपूर्वक काहीही न खाण्याची सवय लावा. सवय लागतेच.

आयुष्यातील ताण कमी करा. यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायाम प्रकार करा. यामुळे रात्री शांत झोप लागेल.

दिवसा व्यवस्थितपणे खाल्याने, अवेळी खाण्याची इच्छा होणार नाही. सकाळचे आणि रात्रीच्या जेवणाची वेळ, जेवण कधीही चुकवू नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

7 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

7 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

7 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

7 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

8 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

13 तास ago