आरोग्य

काही लोकांसाठी भेंडीची भाजी खाणं ठरू शकतं नुकसानकारक

लहान मुले असो वा घरातील मोठ्या व्यक्ती सगळेच आवडीने भेंडीची भाजी खातात. भेंडीची भाजी चवीला तर चांगली लागतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. भेंडीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस असतात.

भेंडीच्या भाजीमध्ये अनेक पोषक तत्व असले आणि त्यांचे शरीराला अनेक फायदे होत असले तरी काही लोकांसाठी भेंडी नुकसान कारक ठरू शकते. असे काही आजार असतात ज्या दरम्यान भेंडी खाणं घातक ठरू शकतं. अशात कुणी भेंडीची भाजी खाऊ नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कुणी खाऊ नये भेंडी

एलर्जी असलेल्यांनी

जर तुम्हाला भेंडीच्या भाजीची एलर्जी असेल तर याचं सेवन करणं बंद करा. भेंडी खाल्ल्यानंतर तुम्हाला पुरळ, खाज, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास, पोटात वेदना अशा समस्या होऊ शकतात.

पचनासंबंधी समस्या असल्यास 

जर तुम्हाला आधीच बद्धकोष्ठता, जुलाब किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम सारख्या पचनासंबंधी समस्या असेल तर भेंडी खाल्ल्याने तुमची समस्या वाढू शकते.

डायबिटीस असेल तर

भेंडीमध्ये ब्लड शुगर कमी करणारे गुण असतात. त्यामुळे तुम्ही जर डायबिटीसचं औषध घेत असाल तर भेंडी खाण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

किडनी स्टोन

किडनी स्टोन झालेल्यांनी भेंडीची भाजी खाऊ नये. कारण यात भरपूर ऑक्सलेट असतं. ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक वाढतो. जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर भेंडीची भाजी खाऊ नये.

गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या

भेंडीमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे काही लोकांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या होऊ शकतात. जशा की, पोटात गॅस होणे, पोट फुगणे आणि अपचन. त्यामुळे अशा समस्या असलेल्या लोकांनी भेंडीची भाजी अजिबात खाऊ नये.

हाय ब्लड प्रेशर

हाय ब्लड प्रेशर असलेल्या रूग्णांनी पोटॅशिअम असलेले पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत. भेंडीमध्ये भरपूर पोटॅशिअम असतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर आणखी वाढू शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

6 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

6 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

6 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

6 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

7 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

17 तास ago