महाराष्ट्र

शाळांजवळ ‘स्टिंग’सह उच्च कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई: विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’सारख्या उच्च कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरल्याचे सांगितले जात आहे.

आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत अनेकदा हा मुद्दा उपस्थित करत शाळांच्या परिसरात सहज उपलब्ध असलेल्या उच्च कॅफिनयुक्त पेयांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे शासनाचे लक्ष वेधले होते. शालेय वयातील मुलांमध्ये अशा पेयांचे वाढते सेवन चिंताजनक असून त्यावर तातडीने निर्बंध घालण्याची आवश्यकता त्यांनी ठामपणे मांडली होती.

तांबे यांनी हा विषय केवळ चर्चेपुरता मर्यादित न ठेवता शाळांच्या परिसरात आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीसंदर्भात स्पष्ट नियमावली तयार करण्याची मागणीही सातत्याने केली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने शाळांच्या ५०० मीटर परिसरात अशा एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात मंत्री नरहरी झिरवळ यांनी संबंधित निर्देश दिल्याची माहिती आहे.

या निर्णयाचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. दरम्यान, अशा पेयांबाबत केवळ शाळा परिसरापुरते निर्बंध न ठेवता राज्यभर कठोर आणि सर्वसमावेशक धोरण लागू करण्याची मागणीही आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याचा घटनाक्रम :

१२ जुलै २०२४ : पावसाळी अधिवेशनात प्रथम मुद्दा उपस्थित.

११ सप्टेंबर २०२४ : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तत्कालीन मंत्र्यांना पत्र देऊन शाळांजवळ कॅफिनयुक्त पदार्थांच्या विक्रीबाबत बैठक घेण्याची मागणी.

२३ जानेवारी २०२५ : मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत बैठक.

२९ जानेवारी २०२५ : एनर्जी ड्रिंक्सवरील धोरण, जनजागृती आणि निर्बंधांबाबत अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा.

१ जुलै २०२५ : पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा ‘स्टिंग’सारख्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदीची जोरदार मागणी.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

5 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

5 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

5 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

6 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

6 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

16 तास ago