आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुम्ही जे काही विचार केलेला आहे ते काम होणार नाही. आज कोणाला कोणतेही वचन देऊ नका. कारण वचन पूर्ण होणार नाही. एखाद्याची मदत करण्याची इच्छा बाळगाल पण त्याच्या मनात तुमचा फायदा घेण्याचा विचार असू शकतो. तुमचा कोणी गैरफायदा घेतलंय का ते सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे. चांगले करण्याच्या विचारात तुम्ही तुमचे नुकसान कराल यासाठी कोणालाही मदत करताना सखोल विचार करा.

वृषभ: आज तुमच्या खांद्यावर अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यावर आज नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. वरिष्ठ तुमच्या कामावर खुष आहेत. ते तुमच्या कामाचे कौतुक करतील तसेच बोनसचा योग आहे. तुम्ही वेळेनुसार कामाचे नियोजन करा त्यामुळे प्रोजेक्ट पूर्ण होण्यात मदत होईल. घरगुती जबाबदाऱ्या देखील वाढू शकतात. एखादा तज्ज्ञाचा सल्ला घ्या त्यामुळे काही समस्या असेल तर ती कमी होईल.

मिथुन: ऑफिसमध्ये जबाबदारी वाढते आहे तेव्हा कामात फोकस ठेवा तरच प्रोजेक्ट पूर्ण होणार. आज फिरताना एखादी प्रिय व्यक्तीसोबत भेट होईल पण तुम्हाला तत्काळ त्यांना मदत करावी लागेल. काही अडचणी येतील पण तुम्ही स्वतःला कमकुवत समजणार नाही.

कर्क: भावनेच्या भरात काही वेळा फार मोठी चूक करता. भविष्यात हेच काम तुमच्यासाठी अडचण बनू शकते. त्यामुळे प्रॅक्टीकल राहून निर्णय घ्या. तुम्ही जे काही काम करत आहात त्यात फोकस करा. इतरांबद्दल चांगला विचार करा आणि कार्य करा. व्यवसायात काम वाढते आहे तेव्हा प्रत्येक गोष्ट तपासून घ्यावी. क्रिएटीव्ह काम करण्याचा योग मिळणार आहे.

सिंह: आज सतर्क राहण्याची गरज आहे. तुमच्या चारी बाजूच्या वातावरणावर बारीक नजर ठेवा तसेच तुमच्या आजूबाजूला काय सुरू आहे, याची माहिती तुम्हाला असालयला हवी. तुमचे विरोधक किंवा व्यवसायातील स्पर्धक तुमच्या मागे हात धुवून लागले आहेत. तुम्ही हुशारीने काम करा. तुमच्या कामाचा वेग वाढवा. कामाचे नियोजन वेळेनुसार करा.

कन्या: नोकरी किंवा व्यवसायात काही बदल करावे लागणार आहे. या परिस्थितीत ज्यांची मदत मिळेल त्यांना हाताशी घेऊन काम अपडेट करा. काम वाढते आहे आणि तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. धनलाभाचे योग आहेत. एखादी व्यक्ती तुमच्यासोबत प्रेम व्यक्त करेल तसेच प्रस्ताव देखील ठेवेल तुम्ही संपूर्ण माहिती घेवून आणि परिस्थितीनुसार निर्णय घ्या. तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होणार आहे तेव्हा सावध राहा.

तुळ: नोकरी- व्यवसायात जास्त मेहनत करावी लागेल. काही सहकारी तुम्हाला मदत करतील. दस्तऐवजावर स्वाक्षरी करताना त्यांना नीट समजून घ्या. जे काही काम करणार त्यात प्लॅनिंग योग्य प्रकारे करा. लवलाइफमध्ये जोडीदार काही सांगत असेल आणि तुम्हाला ते आवडत नसेल तर तुमचे मत स्पष्टपणे व्यक्त करा. कोणतीही गोष्ट अशी करु नका ज्यामुळे नातेसंबंध बिघडतील.

वृश्चिक: जे जातक नोकरी शोधत आहेत किंवा नवीन व्यापार करण्याचा विचार करत आहेत त्यांनी आजूबाजूच्या लोकांची मदत घ्यावी. एखादी व्यक्ती तुम्हाला नक्की मदत करेल. तुम्हाला जसे काम जमते त्याप्रमाणे काम करत राहा. व्यवसायात सहकारी, कामगार यांच्यासाठी ट्रेनिंग कार्यक्रमाचा विचार तुम्ही करणार आहात.

धनु: नोकरी असो वा व्यवसाय काम पूर्ण करताना घाईगडबड करू नका. जर तुम्ही निष्काळजीपणा दाखवला तर महत्त्वाच्या कामाला विलंब लागू शकतो. जी जबाबदारी तुम्हाला हवी आहे, ती दुसरी कोणी तरी मिळवून स्वतःचा स्वार्थ साधू शकते. त्यामुळे वेळ वाया न घालवता काम करावे. नियोजन आणि व्यवस्थापन यामुळेच नोकरी किंवा व्यवसायात यश मिळेल.

मकर: आजचा दिवस चांगला असून जुने संकल्प पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल. एखादे काम लांबवण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात त्यातून अडचणी निर्माण होतील आणि खर्चही वाढेल. तुम्ही एखादा नवस बोलला असाल आणि तुमची मनोकामना पूर्ण झाली असेल तर तातडीने तो नवस पूर्ण करा. आज कामात जास्त मेहनत असून थकवा येण्याची शक्यता आहे. पण काळजी करु नका तुम्ही यशस्वी होणारच आहात.

कुंभ: आज खूप दिवसांनंतर दैनंदिन जीवनात बदल येणार आहे. एखादे मोठे पद मिळत असेल तर ते स्वीकरण्यात वेळ लावू नका. तुमच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. प्रमोशनसोबत जबाबदारी वाढते आहे पण तुम्ही सगळे काम व्यवस्थित पार पाडणार आहात. व्यवसायात नवीन ग्राहक मिळत आहेत त्यामुळे उत्पादनाच्या दर्जावर खास लक्ष द्या.

मीन: आज अनावश्यक दिखावूपणापासून दूर राहावे. तुम्ही जास्त शहाणपण दाखवलं किंवा मलाच जास्त समजते असे वागलात तर हाती घेतलेले काम होणार नाही शिवाय सगळेजण तुमच्यापासून दूर जातील. प्रवासात तब्येत सांभाळा कारण जास्त धावपळ त्रास देणार आहे. संध्याकाळी नटूनथटून कोठे तरी जावे लागेल, किंवा एखाद्या समारंभासाठी तयार व्हावे लागेल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…

7 तास ago

पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला फाशी कधी? राष्ट्रवादी काँग्रेस चा मोदी सरकारवर हल्लाबोल

महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम…

8 तास ago

के.ई.एम. रुग्णालय नामांतरावरून वाद; ‘फलक नव्हे, सुविधा वाढवा’ – अमोल मातेले

मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…

9 तास ago

घराणेशाहीमुळे महिला आरक्षणाला विरोध; नीलम गोऱ्हे यांचा आरोप

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…

9 तास ago

काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात

मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…

9 तास ago

पीसीएम-पीसीबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; दुसऱ्या प्रयत्नासाठी नोंदणीसाठी २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…

9 तास ago