आरोग्य

तुम्ही निरोगी आहात, हे कसं ओळखाल

काही लोक सतत आजारी पडतात. यासाठी अनेकदा ते डॉक्टरांकडे जातात, पण त्याचा कधीही फायदा होत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. आपण काही कारणे जाणून घेऊया. या कारणांमुळे तुम्ही निरोगी आहात का? हे जाणून घेण्यास सोप्प होणार.

1) आहार योग्य आहे का 

आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार. आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते.

२) व्हिटॅमिन-डी ची कमतरता आहे का

सतत आजारी पडण्यामागे अजून एक कारण असू शकते, ते म्हणजे व्हिटॅमिन-डी ची कमतरता असणे.

3) पुरेसे पाणी पिताय का

शरीरात ६०% पाणी असते, त्यामुळे शरीराच्या सगळ्याच क्रिया पूर्ण होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

4.) पुरेशी झोप घेता का

शरीर हे कोणत्याही रोगाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असते. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले शरीर रोग, सूज, जखम ह्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी काही प्रथिने सोडते.

5) तोंडाची नीट स्वच्छता करता का

तोंड हा अनेक बॅक्टेरिया शरीरात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. अनेक चांगले वाईट बॅक्टेरिया आपल्या तोंडात वाढतात आणि नंतर आपल्याला ते आजारी पाडतात

६) कुटुंबात कुणी आजारी पडते का

अनेक वेळा असे दिसून आले आहे की, रक्तातील पांढऱ्या पेशी, ज्या कोणत्याही रोगाचा सामना करतात, त्यांची संख्या जर कमी असेल तर ती व्यक्ती सतत आजारी पडते.

७) तुम्हाला ताण आहे का

धावपळीच्या जीवनात ताण-तणाव नसलेला माणूस मिळणे अशक्य आहे. जर आपल्याला अतिरिक्त ताण असेल, तर त्यामुळे शरीराची हानी होते. यापैकी जे काही कारण आपल्याला सापडेल ते दूर करून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

24 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

24 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

24 तास ago