आरोग्य

दैनंदिन जीवन जगत असताना अशा पद्धतीने जगा

सतत झोप आल्या सारख वाटणे, काम करण्याची इच्छा नसणे, दिवसभर जांभळ्या येणे, अशक्त पणा वाटणे अश्या समस्यांना त्रासलेले आहेत.

झोप पूर्ण न होणे: आपल्या शरीराला किमान 7 ते 8 तास शांत झोपेची आवश्यकता असते. रात्री झोपताना मोबाईल, टॅबचा वापर केल्यानं लवकर झोप लागत नाही. काही वेळा झोपेत मध्येच आपण दचकून उठतो. भीतीनं किंवा टेन्शनमुळेही झोप पूर्ण होत नाही. मेंदू थकल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.

प्रमाणापेक्षा जास्त खाणे: आपण आपला आहार हा थोडी भूक राखून घेतला पाहिजे म्हणजे आपण खाल्लेले अन्न व्यवस्तीत पचेल सुरवातीला जेवण कमी झालं असं वाटलं पण नंतर आपणास सवय लागून जाते.

पुरेसा व्यायाम न करणे: आपल्या शरीराला उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी किमान रोज सकाळी 30 मिनिटं वेगवेगळे व्यायाम करणं आवश्यक आहे. व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण चांगलं होतं. शरीरातील पेशी अधिक चांगल काम करतात तुम्ही दिवसभर उत्साही आणि आनंदी राहता.

आहारात प्रथिनांचं प्रमाण कमी: तुमच्या आहारात भरपूर फळ, अंड, दूधाचा वापर करायला हवा. प्रथिनांचा वापर करायला हवा. चीज, मासे, दही, योगर्ट शेंगदाण्याचा वापर आहारात करा. फास्ट फूड पचनासाठी जड असतं. ते खाणं टाळा. वेळेवर आहार घ्या.

साखरयुक्त पदार्थांचं सेवन टाळा: साखरेचं प्रमाण अति असणारे गोड पदार्थ तुम्हा वारंवार खात राहिलात तर तुम्हाला आळस येऊ शकतो. त्यामुळे दिवसभर मरगळलेले किंवा थकलेलं वाटू शकतं. साखरेचं प्रमाण कमी असणारे पदार्थ खाण्यावर भर द्या.

शरीरात लोहाची कमतरता: आपल्या शरीरातील हिमोग्लोब्लीन किंवा रक्त कमी झालं तरीही आपण काहीही काम न करता आपल्याला दमल्यासारखं होतं. खूपदा डोकं दुखतं आणि चक्करही येते. त्यामुळे तुमच्या आहारात पालेभाज्या, हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी आवश्यक असणारी फळ, खाद्यपदार्थ खाणं आवश्यक आहे.

ताणतणाव: कामाच्या ठिकाणी किंवा घरातही काही वेळ तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. गाणी ऐकणं, चित्र कारणं, फिरणे काहीही जे तुम्हाला आवडतं ते. ज्यामुळे तुम्हाला आलेला ताण कमी होईल. किंवा कामाच्या टेन्शनपासून काही वेळ स्वत:ला लांब ठेवा त्यामुळे तुमचा मूड फेश होईल आणि अधिक जोमानं काम करू शकाल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

7 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

7 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

7 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

7 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

7 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

13 तास ago