Categories: आरोग्य

पेरूच नाही तर पेरूची पाने खाऊनही मिळतात अनेक फायदे

पेरू भरपूर लोक आवडीने खातात. पेरूची आंबट-गोड चव सगळ्यांनाच आवडते. तसेच पेरूचे आरोग्यदायीफायदेसुद्धाअसतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, पेरूची पाने देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि आयर्नसारखे पोषक तत्व भरपूर असतात.

पेरूची पाने चावून खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. ही पाने चावून खाल्ल्याने पचन तंत्र मजबूत राहतं, ब्लड शुगर कंट्रोल राहते, इम्यूनिटी बूस्ट होते, हृदय निरोगी राहतं आणि कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत मिळते.

बद्धकोष्ठता होईल दूर

पेरूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, जे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊन पचन सुधारतं.

कॅन्सरचा धोका होतो कमी

पेरूच्या पानांमधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सने सेल्स डॅमेज रोखून फ्री रॅडिकल्सना नष्ट करण्यास मदत मिळते. अशात संभावित रूपाने कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो.

इम्यूनिटी वाढते

पेरूच्या पानांमधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी यांच्या मदतीने इम्यून सिस्टीम चांगलं आणि मजबूत राहतं. ज्यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शन आणि आजारांचा धोका कमी होतो.

कोलेस्टेरॉल कमी होईल

पेरूच्या पानांमध्ये बॅड कोलेस्टेरॉलची लेव्हल कमी करण्याची क्षमता असते. तसेच या पानांमुळे गुड कोलेस्टेरॉल वाढतं. ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो.

ब्लड शुगर राहतं कंट्रोल

पेरूची पाने जेवणानंतर खाल्ल्यास ब्लड शुगर कंट्रोल राहते. तसेच ब्लड ग्लूकोज लेव्हलही कंट्रोल राहते. ज्यामुळे डायबिटीस असलेल्या लोकांना फायदा मिळतो.

कशी खाल पाने

ताजी पाने हळूहळू चावून खावीत. जेणेकरून त्यांचा रस निघेल. जर पानांची चव तुरट किंवा कडू असेल तर त्यात थोडं मध टाकू शकता. पाने चावून खाल्ल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

12 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

16 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

16 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

17 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

17 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

18 तास ago