आरोग्य

रात्री फळं खावीत की नाही, जाणून घ्या फळं खाण्याची योग्य वेळ

फळं खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. नियमितपणे वेगवेगळ्या फळांचं सेवन करण्याचा आणि ज्यूस पिण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. पण फळं कोणत्या वेळी खावेत आणि कोणत्या वेळी नाही, याबाबत लोक कन्फ्यूज असतात. काही लोक म्हणतात की, फळं रात्री खावीत तर काही लोक म्हणजे रात्री फळं खाणं नुकसानकारक असतं.

कधी खावीत फळ

फळं खाण्याची सगळ्यात योग्य सकाळी उपाशीपोटी असते. सकाळी फळं खाल्ल्याने पचनक्रिया सक्रिय होते. जेवण करण्याआधीही तुम्ही फळं खाऊ शकता. असं केल्यानेही पचनक्रिया चांगली होते. तर जेवण केल्यानंतर फळं खाल्ल्याने पचनक्रिया स्लो होऊ शकते. फळं तुम्ही सायंकाळी नाश्त्याच्या रूपातही खाऊ शकता.

कधी खाऊ नये फळ

फळं रात्री खाणं टाळलं पाहिजे. रात्री फळं खाल्ल्याने गॅस आणि अपचनाची समस्या होऊ शकते. तसेच जेवण केल्यावर लगेच फळं खाणंही चुकीचं आहे. असं केल्यास पोटात जडपणा जाणवू शकतो. जर तुम्ही रात्री फळं खात असाल तर झोपण्याच्या तीन तास आधी फळं खावीत. जर फळं खात असाल तर ताजी आणि सीझनल फळं खावीत.

फळं खाण्याचे फायदे

फळं खाण्याचे वेगवेगळे फायदे होतात. वेगवेगळ्या फळांपासून शरीराला वेगवेगळे पोषक तत्व मिळतात. सोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. फळांमध्ये व्हिटॅमिन्स, फायबर आणि अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. ज्यामुळे इम्यूनिटी बूस्ट होते. फळांमध्ये नॅचरल शुगर असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. ताजी फळं खाल्ल्याने एकंदर आरोग्य चांगलं राहतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

22 मिनिटे ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

25 मिनिटे ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

29 मिनिटे ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

37 मिनिटे ago

नाना पाटेकर-सतीश पुळेकरांच्या मैत्रीत दुरावा; ‘इतकी चांगली मैत्री संपली’, पुळेकरांची खंत

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री…

40 मिनिटे ago

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडाल? जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन संपूर्ण प्रक्रिया

मुंबई: कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे आणि त्याचे नाव शिधापत्रिकेत (रेशन कार्ड) समाविष्ट करायचे…

45 मिनिटे ago