दंतमंजनाचे फायदे
तोंडातील लाळग्रंथी द्वारे सतत लाळ पाझरत असते. लाळ ग्रंथींचे स्वास्थ्य संतुलित असेल तर त्यातून स्रवणारी लाळ ही योग्य प्रमाणात पाझरते. लाळ नैसर्गिक क्षारीय स्वरूपाची असते. दंतमंजनामुळे लाळग्रंथीचे स्वास्थ्य सुरक्षित राहते आणि त्यातून निर्माण होणारा लाळ रसही योग्य स्वरूपात पाझरतो. लाळरस पचनास व रोगप्रतिकारशक्ती अबाधित राखण्यासाठी अतिशय आवश्यक घटक आहे.
हिरड्यांना मसाज केल्यामुळे हिरड्या मजबूत होतात. हिरड्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. हिरड्यांचे काही आजार असतील तर ते दंतमंजनामुळे बरे होण्यास मदत होते.
दातांवरील सुरक्षाकवचही सुरक्षित राहून दातांची स्वच्छता राखली जाते.
दंतमंजनात औषधींचा समावेश
दंतमंजन किंचित तुरट, किंचित तिखट, किंचित कडू चवीचे असावे. त्यानुसार त्यामध्ये वनस्पतींचा समावेश करतात. जसे- कडुनिंब, लवंग, त्रिफळा चूर्ण, भीमसेनी कापूर, सैंधव, तुरटी, हळद इत्यादी. त्रिफळा चूर्णात किंचित सैंधव मिसळूनही वापरू शकता.
दातून अर्थात वनस्पतींच्या काडीचा ब्रश तयार करून वापरावा. जसे- बब्बूल, कडुनिंब, आंबा, वड, खदिर (खैर) इत्यादी.
दंतमंजन गोड, खारट, आंबट चवीचे नसावे.
बाजारात दंतमंजन सहज उपलब्ध आहेत, जसे- विको, सनातनचे दंतमंजन, माकडछाप इत्यादी अनेक पर्याय आहेत.
पूर्वी देशी गायी घरोघरी होत्या. गाईची शेणी (गोवरी) जाळून त्या राखेत थोडे सैंधव मिसळून दात घासले जात. आज अनेक गोशाळा गाईच्या शेणाच्या राखेपासून दंतमंजन तयार करत आहेत. तेही बाजारात उपलब्ध आहे.
आपण ज्या भागात राहतो त्या भागातील तेल घेऊन त्यामध्ये थोडेसे सैंधव व हळद मिसळून हिरड्यांना मसाज करू शकता, त्यामुळे हिरड्या मजबूत होतात.
दंतमंजन कसे करावे
दंतमंजनसाठी बोटांचा वापर करावा. अंगठ्याच्या बाजूचे बोट (तर्जनी) सोडून इतर कोणतेही बोट वापरु शकता. तर्जनीमुळे दात व हिरड्यांवर जास्त जोर पडतो. दाब जास्त पडल्याने ईजा होऊ शकते. अशा रितीने लहानपणा पासूनच मुलांना दंतमंजन पावडरचीच सवय लावणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच अगदी सोपेही आहे. दंतमंजन पावडर मूलांनी गिळली तरी कोणताही अपाय नाही. औषधी वनस्पतीच पोटात जातील. तोंडातील लाळग्रंथी, दात, हिरड्या ह्यांचे स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्यात दंतमंजन इतका सुरक्षित कोणताही पर्याय नाही.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…