आरोग्य

रोज ३ मिनिटे मानेला मसाज करा

हल्ली काही अपवाद सोडले तर प्रत्येकाचीच जीवनशैली खूप बदलली आहे. यामुळे मग अनेक आजारही आपसूकच आपल्याकडे चालून येत आहेत. काही दुखायला लागलं की चटकन औषधं- गोळ्या घेऊन टाकणे हे अगदी कॉमन झालं आहे. पण यामुळे शरीरावर वेगळेच परिणाम होतात आणि त्यातून अनेक आजार ओढवले जातात. म्हणूनच योग अभ्यासक नेहमी हेच सांगतात की तुम्ही काही व्यायाम नियमितपणे करा. यामुळे अनेक आजार आपोआप बरे होतील आणि विनाकारण वारंवार औषधं- गोळ्या घेण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. असाच एक व्यायाम म्हणजे मानेला मसाज करणे.

मानेला मसाज करण्याचे फायदे

१) मानेचे स्नायू अतिरिक्त ताणामुळे आखडून जातात. यामुळे मग डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे असा त्रास होतो. जर तुम्ही मानेला दररोज मसाज केला तर त्यामुळे त्या भागात साचून राहिलेला वात मोकळा होतो. यामुळे त्या भागातला रक्तप्रवाह सुरळीत होऊन डोकेदुखी, ताण, थकवा हा त्रास कमी होऊन फ्रेश वाटते.

२) आयुर्वेदानुसार मानेवर काही मर्मबिंदू असतात. जेव्हा तुम्ही मालिश करत त्यांच्यावर दाब देता तेव्हा आपोआपच शरीरात उर्जा निर्माण होण्यास मदत होते.

३) थायरॉईड आणि हार्मोन्सचे असंतुलन असा त्रास कमी करण्यासाठीही मानेला मसाज करणे उपयुक्त ठरते. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होणारा पीसीओडीचा त्रासही यामुळे कमी होऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

17 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 दिवस ago