kadunimb
कडुलिंबाची केवळ दोन पान तरी दररोज खावी असा सल्ला तुम्ही या आधी देखील नक्कीच ऐकला असेल आणि ते तितकेच खरे देखील आहे. चवीला कडु असलेल्या कडुलिंबाच्या पानांमंध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म आहेत. अनेक प्रकारचे त्वचा रोग, दातांच्या सफाई साठी तसेच इतरही अनेक फायदे कडुलिंबामुळे होतात. आयुर्वेदात कडुलिंबाचे अनेक फायदे सांगितले असून थंडीत कडुलिंब शरीरासाठी फायदेशीर ठरते. साऊथ साईडचे लोक संक्रांती तसेच गुढीपाडवा सणाच्या काळात गुळाच्या पाण्यात कडुलिंब टाकुन काढा बनवतात. चला तर जाणुन घेऊ कडुलिंबाचे फायदे.
पोटातील जंत: पोटांच्या आजारावर कडुलिंबाचा रस अतिशय गुणकारी ठरतो. अती गोड खाल्यास किंवा इतर कारणाने जंत झाल्यास कडुलिंबाच्या रसात मध आणि काळी मिरी घालुन पिल्यास पोटाचे विकार नाहीसे होण्यास मदत होते.
चेहरा: चेहऱ्यावर येणारे फोड किंवा पुरळ यासाठी कडुलिंबाची पान, साल आणि फळ यांच्या एकत्रित मिश्रणाचा लेप लावल्यास चेहरा तजेलदार दिसतो. कारण कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुण असल्याने त्याचा फायदा होता. मात्र या सगळ्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील उत्तम.
कान आणि दात: दात स्वच्छ करण्यासाठी आजही अनेक लोक कडुलिंबाच्या झाडाची काठी वापरतात. यामुळे दात स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते. तोंडाला जर दुर्गंधी येत असेत तर त्यापासून सुटका मिळते. तसेच अनेक टुथपेस्टमध्ये देखील कडुलिंब असल्याचे तुम्हाला माहितीच आहे. त्याचबरोबर कडुलिंबाचे तेल कानात टाकल्यास कानात येणारे पाणी किंवा कान दुखण्यापासून आराम मिळतो. कान हा संवेदनशील भाग असल्याने एकदा डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.
केस: कडुनिंबाच्या कडवटपणा मुळे त्याचा जंतु किटाणु मारण्यासाठी उपयोग होतो. केसात कोंडा झाला असेल किंवा उवा झाल्या असतील तर अशावेळी कडुलिंबाचे तेल किंवा अंघोळीच्या पाण्यात उकळुन कडुलिंबाचा पाला टाकणे फायदेशीर ठरते.
त्वचेचे विकार: कडुलिंबातील औषधी गुणधर्मांमुळे संसर्गजन्य त्वच्या रोगावर कडुलिंबाची पाने फायदेशीर ठरतात. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाणे टाकल्यास फायदा होतो कारण कडुलिंबात किटाणू मारण्याची क्षमता असते. या व्यतिरिक्त कांजण्या किंवा गोवर तसेच देवी सारख्या साथीच्या आजारांच्या वेळी घरगुती उपाय म्हणून कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकली जातात. कडुलिंब थंड असल्याने अंथरुणात अंगाखाली अशा वेळी कडुलिंबाची पान ठेवली जातात. डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी देखील कडुलिंबाचा रस फायदेशीर ठरतो. तांदळाला किड लागु नये, उंदरांपासून रक्षण करण्यासाठी सुकलेला कडुलिंबाचा पाला टाकला जातो. साठवणुकीच्या धान्यात कडुलिंबाचा पाल टाकल्याने वासाने किडे किंवा उंदीर घुशी त्यापासून दुर राहतात.
(सोशल मीडियावरून साभार)
महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…
सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…
'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…
मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…
नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…
ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…