आरोग्य

जास्वंदाचे गुणकारी फायदे

१) काही जणांना केसांना तेल लावायला आवडत नाही. त्यांनी जास्वंदाची १० ते १५ फुलं लोखंडाच्या कढईत थोड्या पाण्यात भिजवावीत. रात्री ते पाणी चांगला अर्क निघेपर्यंत उकळून घ्यावं. सकाळी उठल्यावर तो अर्क केसांना लावा. एकातासाने फक्त पाण्याने केस धुऊन टाकावेत. यामुळे केसांना चांगली चमक येते.

२) हेड मसाजसाठी जे तेल वापरत असाल त्यात, उदाहणार्थ तिळाच्या अथवा खोबरेल तेलात पाच ते सहा जास्वंदाची फुलं टाकावी. हे तेल कोमट करुन कापूस किंवा बोटांऐवजी जास्वंदीच्या फुलांनी केसांच्या मुळांना चोळलं तर केसांची मुळं मजबूत होतात.

३) भरपूर जास्वंदाची फुलं, दोन आवळे, थोडी शिकेकाई आणि दोन रिठे पाण्यात टाकून ते मिश्रण व्यवस्थित उकळवून ठेवा. केसांसाठी हेअरवॉश म्हणून वापरता येईल. हा हेअरवॉश रोज वापरला तरी चालेल.

४) मोड आलेली मेथी, कोरफड चिक, जास्वंदाची फुलं एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक वाटावी. हा पॅक केसांना लावावा. याने केसांना नैसगिर्क चमक येते.

५) जास्वंदीची फुलं, कोरफडीची पानं, ५० मिलि राईचं तेल आणि ५० मिलि तिळाचं तेल एकत्र गरम करून ठेवावं. शक्यतो काचेच्या बाटलीत हे तेल भरून ठेवून वापरावं. आठवड्यातून दोनदा तरी हे तेल केसांना लावावं.

६) बाजारात मिळणारं जास्वंद तेलही खूप गुणकारी असतं. फक्त पाणी घालून ते थोडं पातळ करून लावा.

७) जास्वंद जेलचा अरोमा थेरपीच्या तेलांमध्येही खूप उपयोग होतो. पण तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ते वापरू नये.

८) ब्राह्मी, माका, नागरमोथा, जांभळं आणि जास्वंदीची फुलं एकत्र उकळवून त्याचं पाणी काचेच्या बाटलीत भरुन ठेवावं आणि हेअर वॉटर म्हणून वापरावं.

९) मेंदी कालवताना ताक, जास्वंद तेल आणि मंडूर पावडर एकत्र भिजवावी. हे मिश्रण लावल्यामुळे केसांना नैसगिर्क रंग येतो.

१०) जास्वंद जेलमध्ये शिकेकाई, रिठा, कचूर सुगंधी, संत्र्याची साल आणि मुलतानी माती एकत्र करून त्याचा लेप केसांना लावावा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

12 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

15 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

15 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

16 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

16 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

16 तास ago