आरोग्य

कंबर-पाठ खूप दुखते, रामदेव बाबा सांगतात १ ग्लास दूधाचा खास फॉर्म्यूला

थोडं काम केलं की लगेच अशक्तपणा येतो, थकल्यासारखं वाटत अशा तक्रारी अनेकांना जाणवतात. शरीरात रक्ताची कमतरता, हाडांमध्ये वेदना होतात असे त्रास प्रत्येकालाच उद्भवतात. जर तुम्हालाही फार चक्कर येत असतील आणि भूक लागत नसेल तर तुम्हाला कमकुवतपणाचा सामना करावा लागू शकतो. कमी वयातच तुम्हाला कमकुवतपणा, थकवा जाणवत असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

शरीर निरोगी राहण्यासाठी ताकद असणं फार महत्वाचे असते. ज्यामुळे तुमची इम्यूनिटी चांगली राहते आणि आजारांशी लढण्याची क्षमता मिळते. जर तुमचं वजन कमी जास्त होत असेल आणि अनेक प्रयत्नांनंतरही वजन कमी होत नसेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. योग गुरू बाबा रामदेव यांनी शरीराची ताकद वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे थकवा, कमकुवतपणा कमी होईल.

ताकद वाढवण्याचे ड्रिंक कसे तयार करायचे…

दूध, केळी, खजूर, शतावरी पावडर, अश्वगंधा पावडर, पांढरी मुसली, शतावरी पावडर, अश्वगंधा पावडर, सफेद मुसली, काळ्या कौच बिया हे साहित्य लागेल. सगळ्यात आधी एका कपामध्ये दूध घ्या. थंड किंवा गरम कोणतंही दूध तुम्ही घेऊ शकता. दूधात केळी आणि खजूर घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात शतावरी, अश्वगंधा, पांढरी मुसली आणि कौंच बीयांची पावडर घालून एकत्र करा. नियमित हे दूध प्यायल्याने तब्येतीत सुधारणा दिसून येईल.

केळी आणि खजूर…

केळी आणि खजूर ताकद वाढवण्याचं एक उत्तम औषध असल्याचे सांगितले आहे. हे दोन्ही पदार्थ वजन वाढवण्यासाठी आणि रक्ताची कमतरता दूर करण्याासाठी ओळखले जातात. यात व्हिटामीन्स, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखे पोषक तत्व असतात.

खजूरात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि आयर्न यांसारखी पोषक तत्व असतात. ज्यांचे वजन कमी आहे त्यांच्यासाठी हा घरगुती उपाय परिणामकारक असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले आहे. रोज हे हेल्दी ड्रिंक प्यायल्यान वजन वाढते आणि पर्सनॅलिटीही चांगली राहते. हे ड्रिंक प्यायल्याने अशा लोकांना सगळ्यात जास्त फायदा होतो ज्यांची इम्यूनिटी कमकुवत असते. जर तुम्हीही वारंवार आजारी पडत असाल तर हा उपाय करून पाहा. हे मिश्रण शतावरी पावडर, अश्वगंधा पावडर, सफेद मुसली यांसारक्या पदार्थांनी बनवले जाते. रामदेव बाबांच्यामते हे मिश्रण प्यायल्याने शरीराची ताकद वाढते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस उत्साहवर्धक राहील. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. व्यवस्थापकीय कौशल्यामुळे वरिष्ठांचे कौतुक…

27 मिनिटे ago

विश्वासाशिवाय कॉरिडॉर नाही; विकासासोबत वारकऱ्यांची सेवा आणि शेतकऱ्यांचा सन्मान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर: आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर कॉरिडॉर, शक्तिपीठ महामार्ग, वारकरी…

36 मिनिटे ago

आषाढी वारीसाठी सरकार सज्ज! पंढरपूर विकासासाठी ६७१ कोटी; एअर ॲम्बुलन्स, NDRF, CCTVसह चोख नियोजन

पंढरपूर: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत दर्शनासाठी राज्य सरकारने सर्व यंत्रणा…

39 मिनिटे ago

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

1 दिवस ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

1 दिवस ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

2 दिवस ago