आरोग्य

मोबाईलवर येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे तुम्ही पडू शकता आजारी…

मोबाईल हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री उशिरा झोपेपर्यंत तो वापरतो. अनेक जण सतत फोन वापरतात. मोबाईलचं व्यसन आरोग्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. फक्त फोनच नाही तर त्यावर येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे देखील तुम्ही आजारी पडू शकतात. नोटिफिकेशन अनेक आजारांना आमंत्रण देत आहे.

दिवसरात्र फोन वापरण्याचे दुष्परिणाम…

सकाळी उठून फोन हातात घेऊन वारंवार एखाद्या गोष्टीचा विचार केल्याने चिंता निर्माण होऊ शकते. यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या तक्रारी उद्भवू शकतात.

वारंवार मोबाईलची स्क्रीन पाहिल्याने चिंता वाढते, शरीराची ऊर्जा कमी होते आणि तुम्हाला थकवा आणि सुस्ती जाणवते.

सकाळी उठल्याबरोबर ईमेल किंवा नोटिफिकेशन्स तपासल्याने तुमचं हृदय आणि मन अस्वस्थ होऊ शकतं.

जर तुमच्या मोबाईलवर सकाळी लवकर खूप नोटिफिकेशन्स, मेसेज, ईमेल, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवर मेसेज येत असतील तर ते तुमची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती हिरावून घेऊ शकतं.

फोन आणि सोशल मीडियावर वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे चिडचिड होऊ शकते. याचा तुमच्या मूडवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

मोबाईलवर नोटिफिकेशन्स पाहिल्यानंतर मन त्याच गोष्टींबद्दल विचार करत राहतं. जर सोशल मीडिया काही तणावपूर्ण घडलं तर तुमचा संपूर्ण मूड खराब होऊ शकतो.

रात्री मोबाईल बघून झोपणं आणि सकाळी मोबाईल बघून उठणं यामुळे गंभीर डिप्रेशन येऊ शकतं. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर राग येऊ लागतो.

मोबाईलवरील नोटिफिकेशन्स किती धोकादायक…

फोनचा जास्त वापर लाईफस्टाईलवर नकारात्मक परिणाम करत आहे. कधीकधी ते प्राणघातक देखील असू शकतं. स्मार्टफोनच्या व्यसनाला नोमोफोबिया म्हणतात. नोटिफिकेशन्स तपासण्याची, ते मिस होण्याची, फोन हरवण्याची आणि फोनशिवाय राहण्याची भीती नेहमीच असते. एडोबच्या एका रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, देशातील बहुतेक तरुण या फोबियाचे बळी आहेत. हार्ट केअर फाउंडेशन ऑफ इंडियाच्या तज्ज्ञांच्या मते, फोन असो, संगणक असो किंवा लॅपटॉप असो, त्यावरील नोटिफिकेशन्स आणि अन्य अलर्ट आपल्याला सतत त्यांच्याकडे पाहण्यास भाग पाडतात. आपण फक्त त्यांची वाट पाहत राहतो. जर ते नसेल तर एखाद्याला अस्वस्थ आणि एकटे वाटू लागतं. अशाप्रकारे या नोटिफिकेशन्स आपल्याला आजारी पाडत आहेत.

काय करावं आणि काय करू नये…?

फोन सेटिंग्जमध्ये जा आणि नोटिफिकेशन्स बंद करा, जेणेकरून तुमचं लक्ष पुन्हा पुन्हा त्याकडे जाणार नाही.

दिवसभरात काही तास फोनचा डेटा बंद ठेवा, जेणेकरून शांतता मिळेल.

तुमचा फोन वारंवार चेक करत बसू नका. दर काही तासांनी अपडेट्स तपासा.

सकाळी उठल्याबरोबर काही तास फोनपासून दूर राहा आणि रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी तो बंद करा.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

10 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

11 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

13 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

15 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

15 तास ago