आरोग्य

पावसाळा आणि सर्दी खोकला

पावसाळा सुरु झाला की आपल्याला आल्हाददायी वाटतेच, कारण उकाड्यापासून काहीशी सुटका झालेली असते. पण या वातावरणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना घसा खवखवणे, सर्दी, डोकेदुखी, ताप अशा समस्या सुरु होतात. कालांतराने याचे रुपांतर संसर्गजन्य आजारात होते. अचानक उद्भवलेल्या या समस्या वातावरणातील बदलाने झाल्याचे आपल्या सगळ्यांनाच समजते. यामध्ये पावसात भिजणे, दमट हवामान, अस्वच्छ पाणी, बाहेरचे अन्न खाल्ल्याने होणाऱ्या आजारांचा समावेश असतो. यावर डॉक्टरांकडे जाणे हा उपाय आहेच, पण औषधे घेण्याआधी काही सोपे घरगुती उपाय करुन पाहिल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूयात असेच काही सोपे उपाय…

1) पाणी उकळून, गाळून स्वच्छ करून प्यावे.

2) ऑफिसला जाताना मोजे/ कपडय़ांचा जास्तीचा जोड घेऊन जावा. ओल्या कपडय़ांत बसणे टाळावे. अंग व केस पुसण्यास एखादा नॅपकीनही बाळगावा.

3) शक्यतो चप्पल किंवा पूर्ण बंद असलेली सँडल घालावी.

4) पुरणपोळी, भजी, वडे, ब्रेड, बासुंदी अशा जड पदार्थाचे सेवन टाळावे किंवा असे पदार्थ खाल्ले तरी कमी प्रमाणात खावेत. दुधाची मिठाईसुद्धा जपून खावी.

5) तिखट पदार्थाना आलं, सूंठ, जिरं, मिरीपूड यांची जोड द्यावी.

6) गोड पदार्थाना जायफळ, वेलची पूड (छोटी व बडी वेलची), लवंग अशा पदार्थाची जोड द्यावी.

7) रोज रात्री खालीलप्रमाणे काढा करून गरम गरमच घ्यावा. आले-काळी मिरी- दालचिनी-हळद पाण्यात उकळून काढा करावा. गाळून त्यात थोडा गूळ घालून प्यावे. यामुळे सर्दी-खोकला-अंगदुखी अशा तक्रारींना आळा बसतो आणि लवकर बरे वाटते.

8) जेवणानंतर रोज खालील सुपारी खावी. बडीशेप-ओवा-काळे जिरे-ज्येष्ठमध-जायफळ पूड खाताना त्यामध्ये थोडे काळे मीठ घालून खावी. मीठ त्यात घालून ठेवू नये.

9) जेवणात सूप/ डाळीचे कढण/ भाताची पेज/ कोकम सार/ ताकाची कढी असे पातळ व गरम पदार्थ नेहमी समाविष्ट करावेत.

10) जखम झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन इलाज करणं गरजेचं आहे.

11) घरात कीटकनाशकांचा फवारा मारून घ्यावा. अन्यथा रोज लसूण व कांद्याची सालं घरात जाळून धूर करावा. याने डास कमी होतात.

12) शिळे/ उघडय़ावरील अन्न खाऊ नये. हलका आहार घ्यावा. उष्ण पदार्थ खावेत.

13) रुमालात ओव्याची पुरचुंडी बांधून नेहमी जवळ बाळगावी. सर्दी-खोकला-डोकेदुखी वाटू लागल्यास पुरचुंडी चुरून त्याचा सतत वास घेत राहावा. रात्री झोपताना सूंठ व वेखंड (१:४ प्रमाण) याचा लेप कपाळावर लावावा.

14) दोन दिवसांपेक्षा अधिक दिवसांचा ताप, उलटय़ा व जुलाब अंगावर काढू नये.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

23 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago