मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील त्या गावचे आरोग्य केंद्र ठरतंय ‘मृत्यू केंद्र’ ; बेजबाबदार डॉक्टरांवर ग्रामस्थांचा संताप

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सेवा वैदयकिय अधिकारी उपलब्ध नसल्याने अक्षरशः ठप्प झाली आहे. धक्कादायक म्हणजे नागरिकांना तक्रारीसाठी

तेथे तक्रार पुस्तिका व हालचाल रजिस्टर उपलब्धच नाही.येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णांचा जीव धोक्यात घालून ‘फक्त पगारखाऊ नोकरशहा’ म्हणून वागत असल्याचा संतापजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दोन डॉक्टरांची नेमणूक असूनही ते केंद्राच्या निवासस्थानी न राहता परगावी मजेत राहतात. रोज सकाळी थोडा वेळ येतात आणि कर्मचाऱ्यांच्या जीवावर दुपारी केंद्र सोडून निघून जातात. त्यामुळे १२ गावं आणि ४ उपकेंद्रांतील रुग्णांना उपचाराऐवजी प्राणघातक प्रतीक्षा करावी लागत आहे. एका मुजोर वैद्यकिय आधिकार्‍याचे वडील बडे आधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना वरीष्ठ आधिकाऱ्यांवर त्यांचा दबाव येतो अशी माहीती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

गरोदर माता, सर्पदंश, अपघातग्रस्त, हृदयविकाराचा झटका अशा गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत तर मृत्यू ओढवतो. अनेकदा रुग्णांना खासगी रुग्णालयांचा मार्ग धरावा लागतो. मंचर, नारायणगाव, शिरूर येथे नेण्यासाठी वेळ, पैसा आणि जीव दोन्ही धोक्यात घालावे लागतात. “सरकारी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे पेशंटला जीव गमावण्याची वेळ येते. ,असा थरकाप उडवणारा आरोप ग्रामस्थांनी थेट केला आहे.

स्थानिक कर्मचारी कितीही धावपळ करत असले तरी डॉक्टरच अनुपस्थित राहिल्याने उपचाराचा पाया कोसळतो. पावसाळ्यात साथीचे आजार पसरत आहेत, अपघातांची संख्या वाढली आहे, पण डॉक्टर मात्र शिरूरच्या थाटात बिझी आहेत! सरकारी निवासस्थान असूनही न राहणे, कर्तव्यावर दिरंगाई करणे आणि रुग्णांना मृत्यूच्या दाराशी ढकलणे, ही गंभीर बेपर्वाई असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीमध्ये रोष उसळला आहे.

“बेजबाबदार डॉक्टरांची बदली करून येथे जबाबदार व रहिवासी अधिकारी नेमले नाहीत, तर आम्ही रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्रात प्रवेश करू देणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू!” असे तेथील नागरिकांनी सांगितले आहे.नागरिकांचा संताप आणि मृत्यूच्या छायेतूनही आरोग्य विभागाने आत्तापर्यंत केवळ ‘दुर्लक्ष’च केले आहे. “सरकारी पगार घेऊन डॉक्टर शिरूरमध्ये सुखासीन जीवन जगणार, आणि टाकळी हाजीचे नागरिक मात्र मृत्यूला सामोरे जाणार – हे आता आम्हाला सहन होणार नाही, असा जाहीर इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मुख्यालयी निवासी राहूनच वैदयकिय अधिकाऱ्यांनी काम करावे. टाकळी हाजी येथे हलगर्जीपणा करणाऱ्या उपस्थित व निवासी न राहणाऱ्यां वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ नोटीस बजावून कारवाई करणार आहे.

राजेश कट्टीमणी -प्रभारी तालुका आरोग्य आधिकारी,शिरूर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

7 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

13 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

13 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

14 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

14 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

14 तास ago