हिवाळ्यातील दिवसांमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. या दिवसांमध्ये आहारातील बदल आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेक समस्या निर्माण होतात. पण या ऋतूमध्ये काही फळे खाणे शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतं. त्यापैकी केळं हे एक असं फळ आहे जे केवळ टेस्टीच नाही तर आरोग्यासाठीही खूप उपयोगी आहे. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न असतो. कच्चं केळं अधिक फायदेशीर की पिकलेल.
पिकलेल्या केळ्याचे फायदे
पिकलेल्या केळ्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ते ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स अधिक असतो, म्हणजेच ते शरीराला पटकन ऊर्जा पुरवतं. पचनासाठी पिकलेलं केळं हलकं आणि सोपं असतं. त्यामुळे लहान मुलं आणि खेळाडूंसाठी पिकलेलं केळं आदर्श मानलं जातं.
कच्च्या केळ्याचे फायदे
कच्च्या केळ्यात रेझिस्टंट स्टार्च असतो. हा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे. जो पचनाची प्रक्रिया स्लो करतो आणि ब्लड शुगर नियंत्रित ठेवतो. यात फायबरचं प्रमाण जास्त असतं, जे पचनसंस्थेसाठी चांगलं असतं. डायबिटीस किंवा इन्सुलिन रेसिस्टन्स असलेल्या लोकांसाठी कच्चं केळं अधिक फायदेशीर ठरतं.
वजन कमी करण्यासाठी कोणतं केळं योग्य
वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी कच्चं केळं सर्वोत्तम पर्याय आहे. यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतं, त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि जास्त खाणं टाळता येतं, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.
कच्चं की पिकलेलं – कोणते चांगले
दोन्ही प्रकारची केळी आपल्या-आपल्या फायद्यांसाठी उपयोगी आहेत. पिकलेले केळं ऊर्जेसाठी उत्तम, तर कच्चं केळं पचन आणि ब्लड शुगर नियंत्रणासाठी उत्तम.
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…