आरोग्य

रात्री उशीरा जेवायची सवय पडू शकते महागात

अनेकांना रात्री उशीरा जेवायची सवय असते. प्रवासात होणारा उशीर, ट्रॅफिक, डेडलाईन्स, कामाचा ताण या सगळ्यात बऱ्याचदा जेवणासाठी उशीर होतो. कामामुळे कधीकधी जेवायला उशीर होणे साहजिक आहे, पण काहींना रोज रात्री उशीरा जेवायची सवय लागते. पण रात्री उशीरा जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अनेकांना माहित नसते. रात्री ८ वाजल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे. रात्री उशीरा जेवल्याने पचनाबरोबर पुढील समस्या उद्भवू शकतात.

वजन वाढणे: रात्री उशीरा जेवल्याने वजन वाढू शकते. अनेकांना डाएट करून किंवा नियमित व्यायाम करूनही वजन कमी करण्यात यश मिळत नाही, याचे कारण रात्री उशिरा जेवणे. रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे.

झोप पूर्ण न होणे: रात्री उशीरा जेवल्याने शरीरातील नैसर्गिक पचन प्रक्रियेवर परिणाम होऊन, झोपल्यावर अस्वस्थ वाटू शकते. त्यामळे झोप पूर्ण न होण्याची समस्या उद्भवू शकते.

रक्तदाब अनियंत्रित होणे: रात्री उशीरा जेवल्याने रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री उशीरा जेवणे टाळावे.

पचनाशी निगडित समस्या: रात्री उशीरा जेवल्या नंतर लगेच झोपल्यामुळे पचनाशी निगडित समस्या उद्भवू शकतात.

शरीरातील ऊर्जा कमी होणे: रात्री उशीरा जेवल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी बद्धकोष्ठता, डोकेदुखी किंवा इतर काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी झाल्याचे जाणवते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

12 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago