आरोग्य

पोट साफ न होण्याची कारणे

तुम्ही दिवसभर अॅक्टिव राहत नाहीत. दिवसभर लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा टीव्ही समोर असता किंवा फोन बघत असता. अशात फिजिकल ॲक्टिविटी जास्त होत नाही. याचा प्रभाव थेट पोटावर पडतो. तुम्ही जे खाता, पिता किंवा विचार करता त्याचा पोटावर प्रभाव पडतो. तुम्ही जर रात्री उशीरा खाता किंवा जास्त कार्ब्स खाता, ब्लू लाईटच्या संपर्कात जास्त राहता, तसेच तुम्ही फार जास्त तणावात राहत असाल, जास्त धुम्रपान करत असाल, रात्री उशीरा झोपत असाल तर या गोष्टींचा पोटावर नकारात्मक प्रभाव पडतो. हे लक्षात ठेवा की, जास्तीत जास्त आजार हे पोटापासूनच सुरू होतात.

पोट साफ करणारा खास चहा

ग्रीन टी:- ग्रीन टी मध्ये असे अनेक गुण असतात जे शरीराला डिटॉक्स करतात आणि पोट साफ करण्यासही मदत करतात. ग्रीन टी लॅक्सेटिवसारखं काम करत नाही. पण याच्या सेवनाने शरीराला अ‍ॅंटी ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी इन्फ्लेमेटरी गुण मिळतात, जे पचनक्रिया सुरळीत करतात. याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

तुळशीच्या पानांचा चहा:- तुळशीमध्ये अनेक औषधी गुण असतात. सामान्यपणे तुळशीचं सेवन सर्दी-पडसा कमी करण्यासाठी केलं जातं. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी देखील तुळशीच्या पानांचा चहा पिऊ शकता. यासाठी तुळशीच्या पानांना एक कप पाण्यात टाकून उकडा. त्यात लिंबाचा रस टाका आणि सेवन करा.

पुदीन्याचा चहा:- पोट साफ न होण्याची समस्या दूर करण्यासाठी पुदीन्याच्या पानांचा चहा प्रभावी उपाय ठरू शकतो. या पानांमधील लॅक्सेटिव गुण पचनक्रिया चांगली करण्यास मदत करतात. पाण्यात पुदीन्याची काही पाने आणि आल्याचा एक तुकडा टाकून उकडा. याचं सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.

कढीपत्त्याचा चहा:- पोट साफ होण्यासाठी कढीपत्त्याचा चहा देखील फायदेशीर ठरू शकतो. या पानांमध्ये आयर्न आणि कॅल्शिअम भरपूर असतं. तसेच या पानांमुळे पचन तंत्र मजबूत राहतं. यासाठी काही पाने वाळवून आणि बारीक करून पाण्यात टाकून सेवन करा. याने तुमचं पोट साफ होण्यास मदत मिळेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

2 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

3 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

3 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

3 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

3 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

3 दिवस ago