हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे
गुळ हा गरम असतो. ज्यामुळे याच्या नियमित सेवनाने शरीर आतून गरम राहतं. गुळाच्या सेवनाने शरीराचं ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होतं. हिवाळ्यात गुळाचं सेवन करण्याचे अनेक फायदे असतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत आणि याचं सेवन कसं करावं हेही सांगणार आहोत.
१) मसल्स मजबूत होतात:- हिवाळ्यात गुळाचं सेवन खूप फायदेशीर ठरतं. गुळामध्ये आयर्न असतं. आयर्न हेल्दी ब्लड सेल्सला सपोर्ट करण्यात मदत करतं. याने तुमचा थकवा दूर होईल आणि मांसपेशी मजबूत होतील.
२) एनीमियापासून बचाव:- शरीरात आयर्नची कमतरता झाली की, एमीनियाचा धोका वाढतो. ज्यामुळे मसल्स कमजोर होतात आणि थकवा जाणवतो. त्यामुळे गूळ आयर्नचा महत्वाचा स्त्रोत ठरतो. याचा नियमित आहारात समावेश केल्याने एनीमियाचा धोका कमी होतो.
३) आजारांचा धोका कमी होतो:- हिवाळ्यातील तुमच्या रोजच्या आहारात गुळाचा समावेश करणं अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं. यात अॅंटी-ऑक्सिडेंट आणि फेनोलिक अॅसिड असतं, ज्यामुळे शरीरावर ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी पडतो.
४) पचन तंत्र चांगलं राहत:- पचन तंत्र चांगलं ठेवण्यासाठी गुळाचा खूप फायदा होतो. बरेच बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी नियमितपणे गुळाचं सेवन करतात.
५) इम्यूनिटी वाढते:- गुळाचा वापर अनेक आजार दूर करण्यासाठी केला जातो. गुळात असलेल्या पोषक तत्व आणि अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे इम्यून सिस्टीमही मजबूत होतं. अशात अनेक जुन्या आजारांना रोखलं जाऊ शकतं.
कसं कराल गुळाचं सेवन
गूळ तुम्ही थेटही खाऊ शकता. जर तुम्हाला थेट गूळ खाणं आवडत नसेल तर याचे गूळ आणि तिळाचे लाडू, गूळ आणि शेंगदाण्याचे लाडूही बनवू शकता. तुम्ही रोज २५ ग्रॅम गुळाचं सेवन करू शकता. जास्तीत जास्त लोक हिवाळ्यात गुळाच्या चहाचं सेवन करतात. महत्वाची बाब म्हणजे खूप जास्त गूळ खाल्ल्याने तुम्हाला जुलाब लागू शकतात.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…