आरोग्य

काळ्या-पिवळ्या-लाल की हिरव्या, कोणते मनुका खाणं जास्त फांयद्याच

ड्रायफ्रुटस मधील ‘मनुका’ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातात. वेगवेगळ्या प्रकारच्या गोड पदार्थांमध्ये देखील आपण सुकामेवा म्हणून ‘मनुका’ घालतो. हेल्दी आणि निरोगी लाईफस्टाईलसाठी रोजच्या डाएटमध्ये आहारासोबत रोज मूठभर ड्रायफ्रूट्स खाणे फायदेशीर मानले आहेत. मनुक्यामध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात

साधारणतः आपण पाहिले तर मनुक्यांच्या रंगांनुसार त्यांचे वेगवेगळे असे चार प्रकार असतात. बाजारात काळे, पिवळे, लाल, हिरवे इतक्या रंगांचे मनुके सहज विकत मिळतात. परंतु या सर्व मनुकांमध्ये कोणत्या रंगाच्या मनुक्यात कोणते गुणधर्म असतात आणि नक्की कोणता मनुका आपल्या आरोग्याासाठी सर्वात फायदेशीर मानला जातो, याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. हिरवे, पिवळे, लाल आणि काळे मनुके यांच्यातील पोषक तत्व आणि पौष्टिकतेचे गुणधर्म भिन्न असतात.

रंगानुसार मनुक्यांमध्ये कोणते गुणधर्म असतात

1) हिरवे मनुका: हिरवे मनुके हे हिरव्या द्राक्षांपासून तयार करतात. द्राक्षांच्या लांबी आणि जाडीवरून मनुक्यांचा आकार आणि चव बदलू शकते. हिरव्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह,अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. या पोषक तत्वांमुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच, मात्र मानसिक आरोग्यातही सुधारणा होते.

2) पिवळा मनुका: पिवळा किंवा सोनेरी रंगाप्रमाणे दिसणारा मनुका हा चवीला गोड असतो. त्यामुळे विविध खाद्यपदार्थांमध्ये या मनुक्यांचा वापर जास्त होतो. विविध प्रकारच्या द्राक्षांपासून हे मनुके तयार केले जाते. पिवळ्या मनुक्यांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. पिवळे मनुके गोड असल्याने त्यात नैसर्गिक साखरचं प्रमाण अधिक असतं. मात्र असं असलं तरीही यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. पचनक्रिया सुधारण्यासाठीही पिवळे मनुके फायद्याचे आहेत.

3) लाल मनुका: लाल द्राक्षापासून लाल मनुके तयार होतात. जशी लाल द्राक्षांची चव ही आंबट गोड असते तशीच लाल मनुक्यांचीही चव बदलत जाते. लाल मनुक्यांमध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असतात. लाल मनुक्यातल्या लोहामुळे रक्त शुद्ध व्हायला आणि वाढायला मदत होते तर व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. फायबर्समुळे अन्न पचायला मदत होते. लाल मनुका हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो.

4) काळ्या मनुका: काळे मनुके हे काळ्या द्राक्षांपासून तयार केले जातात. काळ्या मनुक्यांची चवही आंबट गोड असते. मात्र काळ्या मनुका हा लाल मनुक्यांपेक्षा जास्त फायदेशीर मानला जातो, कारण यात लोहाचं प्रमाण अधिक असतं म्हणून त्यांचा रंगही काळा असतो. काळ्या मनुक्यांमुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच. मात्र रक्तदाबही नियंत्रित व्हायला मदत होते. काळ्या मनुकामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. जगभरातल्या लोकप्रिय मनुक्यापैकी काळा मनुक्याला पसंती अधिक असते.

5) कोणत्या रंगाचे मनुके आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत

आपण पाहिलं की प्रत्येक रंगाच्या मनुक्यांमध्ये वेगवेगळे आरोग्यदायी गुणधर्म आहेत. मनुक्यांच्या रंगामुळे त्यांच्या पोषक तत्वांमध्ये सुद्धा बदल दिसून येतात. जसं हिरव्या रंगाच्या मनुक्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पिवळ्या मनुक्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहते. लाल मनुके हृदयासाठी फायद्याचे आहेत तर काळ्या मनुक्यांमुळे ॲनिमियासारखा आजार दूर व्हायला मदत होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मनुका निवडू शकता. मनुके खाताना शक्यतो ते रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी ते खाल्ले तर जास्त फायदेशीर असतात. शिवाय एकाच वेळी जास्त प्रमाणात मनुके खाणे टाळा. रोज अगदी ५ ते ६ मनुके खाल्ले तरी चालतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘ज्ञानाचा महासागर हरपला’; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी; एकनाथ शिंदे

कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…

8 तास ago

पुणे–नाशिक सरळ रेल्वेसाठी तज्ज्ञ समिती स्थापन; सत्यजीत तांबे यांनी केला निर्णयाचे स्वागत

६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…

8 तास ago

घोडनदी बार असोसिएशनची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात; बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप

निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…

8 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे; सुनिल तटकरे यांच्याकडून नियुक्ती जाहीर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…

11 तास ago

म्हाडाच्या प्रलंबित प्रकल्पांना गती; मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…

11 तास ago

एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या महिला तलाठीवर पुन्हा लाचेचा गुन्हा; महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…

12 तास ago