आरोग्य

पित्ताचा त्रास, आंबट ढेकर या उपायाने कमी करा

उत्तम पचनासाठी पित्ताची लेव्हल योग्य असणे गरजेचे असते. पण जर पित्त वाढले तर मात्र तुम्हाला मोठा त्रास होऊ शकतो.

पित्त हे लिव्हर मध्ये तयार होते आणि पित्ताशयाच्या पिशवीमध्ये जमा होते. येथून अन्नाच्या पचनासाठी छोट्या आतड्यांमध्ये ते सोडले जाते. आयुर्वेदामध्ये पित्त पचनशक्ती किंवा अग्नी या नावाने ओळखले जाते. ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतो त्यांना आठवड्यातून एकदा तरी उलट्या होतात. प्रत्येक आठवड्याला या त्रासाला सामोरे जावे लागते. अगदी वैताग येतो. विविध औषधे केली तरी तात्पुरता आराम मिळतो आणि मग पुन्हा जैसे थे. पित्ताचा त्रास त्यांना होतो ज्यांच्या शरीरात उष्णता फार जास्त असते. उष्णतेमुळे पित्तामध्ये वाढ होते आणि मग ते पित्त उलटून पडते. जर ते बाहेर निघाले नाही तर, मग डोके प्रचंड दुखायला लागते. पित्त शांत होईपर्यंत हा त्रास सहन करावा लागतो. काही घरगुती उपायांनी पित्त शांत करता येते.

आम्ल पित्त

काहीही खाल्यावर जळजळणे किंवा आंबट ढेकर येणे. तसेच छातीत सारखे दुखणे आणि श्वास घेताना त्रास होणे ही हायपर अॅसिडीटीची लक्षणे आहेत. त्याला आयुर्वेदामध्ये आम्ल पित्त असे म्हटले जाते. असा त्रास सारखा झाल्याने मग उलट्या होतात. या आम्ल पित्ताच्या त्रासापासून वाचण्यासाठी काही सोपे उपाय करा.

उपाय

शरीरात खूप उष्णता असेल तर तुम्ही तांदळाचे वा भाताचे पाणी प्य्याला हवे.यामुळे शरीरात थंडावा वाढतो. जर तुम्हाला पित्ताची लक्षणे दिसत असतील आणि तुमच्या शरीरात खूप जास्त उष्णता झाल्याचे तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही नियमितपणे तांदळाचे पाणी प्यायला हवे.

रोज रात्री झोपण्याआधी चमचाभर धने पाण्यामध्ये भिजत घाला. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी प्यायचे. धने पित्तशामक असतात.

जेवणानंतर बडीशेप खा. बडीशेप पचनासाठी फार चांगली असते. तसेच पोटाला थंडावा देते. बडीशेप आणि खडीसाखर खाल्याने पित्तावर नियंत्रण ठेवता येते. जेवणानंतर हे मिश्रण खात जा.

किंवा एक कप पाण्यात काही बडीशेप घेऊन ती उकळवा आणि त्याचा काढा प्या. बडीशेपमध्ये तेल असते जे पचनाला मदत करते

आम्ल पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मस्त उपाय म्हणजे गुलकंद खाणे. गुलकंद थंड असतो. गुलकंद हा पित्तशामकही असतो. चमचाभर गुलकंदही पुरेसा आहे.

नारळ पाणी पिणे हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे. तसेच लिंबू पाणीही पिऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

14 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

14 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

14 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

14 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

14 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

14 तास ago