आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून अनुकूल आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणार आहेत आणि व्यवसायात नफा मिळेल. संध्याकाळी एखाद्या कौटुंबिक मंगल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा असून प्रमोशनचे योग आहेत. तब्येतीमध्ये सुधारणा आहे, मात्र मानसिक चिडचिड होत राहणार आहे. योग आणि प्राणायाम तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

वृषभ: मालमत्ता संबंधित व्यवहारांमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. जमिनीसंदर्भात काही कामे थांबलेली असतील तर ती पूर्ण होतील. घरात तुम्हाला ज्येष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि घरातील वातावरण समाधानी असेल. कामाच्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे, जे तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरेल. संध्याकाळी कला आणि संगीतामध्ये रुची निर्माण होईल. खूप ताणतणाव घेवू नका त्यामुळे त्रास होवू शकतो.

मिथुन: आज तुमच्यातील आत्मविश्वास द्विगुणीत होणार आहे. तसेच मुलांकडून चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी बढतीचे योग असून मानसन्मान वाढेल. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. दुपारनंतर तब्येत थोडी बिघडू शकते, आहारावर नियंत्रण ठेवा. तसेच प्रवास टाळणे तुमच्यासाठी उत्तम असेल.

कर्क: प्रवासात लाभ असून भविष्यात त्याचा मोठा फायदा होवू शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात यश मिळेल. जुने मित्र भेटतील आणि तुम्हाला कामात मदत करतील त्यामुळे कामे व्यवस्थीत पूर्ण होणार आहेत. तब्येत चांगली असून ताणतणाव वाढू देवू नका. संध्याकाळी आध्यात्मिक किंवा क्रिएटीव्ह कामात अधिक व्यस्त राहणार आहात. घरात वातावरण समाधानाचे असेल.

सिंह: एखाद्या शुभकार्यासाठी प्रवास करणार असून तुमचा खर्च वाढेल. उत्पन्नात वाढ असून व्यवसायासाठी नवीन संधी मिळेल. मित्रांचा चांगला पाठिंबा असेल त्यामुळे तुमचे मनोबल उंचावेल. कामात तुम्ही जोश दाखवाल आणि जे काही ठरवले आहे ते पूर्ण कराल. तब्येतीची काळजी घ्या कारण पचनाचा त्रास होवू शकतो. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.

कन्या: आज ऑफिसच्या कामात दबाव आणि आव्हाने दोन्ही असणार आहेत. मेहनत अधिक घ्यावी लागेल, पण त्याचे परिणाम समाधानकारक असतील. मुलांकडून शैक्षणिक यशाची बातमी मिळेल. कौटुंबिक मतभेद कमी होतील त्यामुळे तुम्ही थोडे समाधानी असाल. आर्थिक स्थिती हळूहळू उंचावते आहे. तब्येतीची काळजी घ्या, जंक फूड खाणे टाळा.

तुळ: आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. तुम्हाला काही असे कार्य करावे लागू शकते जे तुमच्या इच्छे विरुद्ध असेल, परंतु त्याचा फायदा भविष्यात होईल. खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेटनुसार खर्च करा. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होणार आहे. संध्याकाळी धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत.

वृश्चिक: तुमचे पेमेटं येणे बाकी आहे किंवा कुठेतरी धनसंपत्ती अडकली असेल तर ती मिळू शकते. मुलांकडून शैक्षणिक बाबतीत चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा आणि प्रमोशनचे योग आहेत. तब्येत उत्तम आहे पण डोळ्यांचा आजार थोडा त्रास देवू शकतो. कौटुंबिक जीवनात सुखशांती समाधान असेल.

धनु: कामाच्या ठिकाणी अडथळे असून तुम्ही संयमाने त्यांचा सामना कराल. घरात मालमत्ता वाद आणि भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. प्रवास करताना काळजी घ्या. तब्येतीच्या बाबतीत सतर्क राहा. तेलकट, मसालेदार आणि जंक फूड खाणे टाळावे. धार्मिक कार्यांमध्ये अधिक रुची घेणार आहात, यामुळे तुमचे मन शांत राहील.

मकर: आज प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ मिळेल. संपत्ती आणि मानसन्मान वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जीवनात सकारात्मक बदल होत आहेत अशी जाणीव होईल. विरोधकांवर मात करणार आहात. प्रवासाचा योग असून त्यातून उत्तम लाभ मिळेल. धनलाभाचे योग आहेत.

कुंभ: कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत. तसेच प्रमोशनची शक्यता आहे. धार्मिक कार्यांमध्ये सहभाग वाढेल. जोडीदारासोबत थोडा वाद होण्याची शक्यता आहे. संवादात गोडवा ठेवा म्हणजे कामे पटापट होतील. संपत्ती किंवा मालमत्ता यासंदर्भात काही कायदेशीर प्रकरण सुरु असेल तर तुमच्या बाजूने निकाल लागेल. संध्याकाळी धार्मिक कार्यासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे.

मीन: मालमत्तेशी संबंधित जास्त खर्च होणार आहेत. दरम्यान नवीन उत्पन्नाचे मार्ग समोर येतील तुम्ही त्यावरुन नक्की वाटचाल करा. घरात पाहुण्यांचे आगमन आनंद वाढवेल पण त्याचबरोबर खर्च देखील वाढविणार आहे. राजकारण किंवा सामाजिक कार्यात सहभाग घेतल्यास लाभ मिळेल. मालमत्ता किंवा व्यवसायात गुंतवणूक करणे उत्तम राहील. धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

13 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

13 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

14 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

19 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

19 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

19 तास ago