आरोग्य

तांदळाचं पाणी त्वचेसाठी व केसांसाठी खूप फायदेशीर

तांदळाचा वापर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. भात तर लोक रोजच खातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तांदळाचा वापर तुम्ही त्वचा चमकदार करण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी करू शकता. फार पूर्वीपासून तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जातो. तांदळाच्या पाण्यानं त्वचा साफ होते, हायड्रेट राहते आणि चमकदारही होते. कारण यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, अमीनो अ‍ॅसिड आणि स्टार्च भरपूर प्रमाणात असतं. हे तत्व त्वचेची जळजळ कमी करतात व केस मजबूत करतात.

तांदळाच्या पाण्याची खासियत म्हणजे हा एक नॅचरल उपाय आहे. इतर केमिकल प्रोडक्ट्ससारखे याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. त्यामुळे तांदळाच्या पाण्याचा वापर तुम्ही त्वचेसाठी आणि केसांसाठी बिनधास्त करू शकता. सोबतच यासाठी तुम्हाला जास्त खर्चही लागत नाही. महत्वाची बाब म्हणजे हे पाणी उन्हाळ्यात त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतं.

नॅचरल टोनर

तांदळाचं पाणी एक इफेक्टिव टोनरसारखं काम करतं. त्वचेची रोमछिद्रे मोकळं करतं आणि त्वचा टाइट करतं. तांदळाचं पाणी कापसाच्या मदतीनं चेहऱ्यावर लावल्यास त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसते. त्याशिवाय सनर्बन कमी करण्यास, सूज कमी करण्यास आणि रेडनेस कमी करण्यासही तांदळाचं पाणी मदत करत. ज्या लोकांना डार्क सर्कल आणि पफीनेसची समस्या आहे, त्यांच्यासाठी तांदळाचं थंड पाणी एक चांगला पर्याय आहे. तांदळाच्या थंड पाण्यात कॉटन बुडवून तो काही मिनिटांसाठी डोळ्यांखाली ठेवा. डार्क सर्कल कमी होईल आणि तुम्हाला आरामही मिळेल.

मजबूत आणि चमकदार केस

त्वचेसोबतच तांदळाचं पाणी केसांसाठी खूप फायदेशीर ठरतं. शाम्पू केल्यानंतर तांदळाच्या पाण्यानं केस धुतल्यास केस मुलायम, चमकदार होतील. तसेच या पाण्यानं डोक्याच्या त्वचेला पोषणही मिळतं. केसगळती, केस तुटणे अशा समस्याही दूर होतात.

तांदळाचं पाणी कसं बनवाल

१) तांदूळ चांगले धुवून घ्या, हे काही तास किंवा रात्रभर भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून एखाद्या बॉटलमध्ये स्टोर करा.

२) तांदळाच्या वापराची दुसरी पद्धत म्हणजे तांदूळ अधिक पाण्यात शिजवा. पाणी गाळून घ्या आणि वापरण्यासाठी थंड होऊ द्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

56 मिनिटे ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

20 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago