आरोग्य

नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसणारी महत्त्वाची लक्षण कोणती

आपल्या शरीरातील नसा म्हणजे रक्तवाहिन्यांचं जाळं, जे संपूर्ण शरीराला रक्त आणि पोषक तत्वं पोहोचवण्याचं काम करतं. पण चुकीच्या आहार-सवयी आणि जीवनशैलीमुळे नसांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका वाढतो. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसणारी महत्त्वाची लक्षण कोणती 

१) छातीत वेदना किंवा जडपणा

जर तुम्हाला छातीच्या मधोमध वेदना जाणवत असतील किंवा जडपणा वाटत असेल, तर हे नसांमध्ये ब्लॉकेजचं लक्षण असू शकतं. हृदयाला योग्य प्रमाणात रक्त न मिळाल्यास अशा वेदना होतात.

२) श्वास घेण्यास त्रास

ब्लॉकेजमुळे शरीरात ऑक्सिजनचा अभाव होतो, ज्यामुळे थोडंसं काम केलं तरीही श्वास लागतो. अशी अडचण जाणवत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

३) वारंवार थकवा आणि अशक्तपणा

जर तुम्हाला कोणतीही मेहनत न करता सतत थकल्यासारखं वाटत असेल, तर हेही ब्लॉकेजचं संकेत असू शकतं. रक्तप्रवाह कमी झाल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही.

४) चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे

मेंदूपर्यंत रक्त आणि ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचल्यास चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडण्याची शक्यता असते. हे लक्षण दिसताच सावध व्हा.

5) हात-पाय थंड पडणे किंवा सुजणे

ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित न झाल्यामुळे हात-पाय थंड पडतात किंवा सुजतात. जर तुम्हाला सतत हा त्रास होत असेल, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.

वेळीच पाऊल उचला, निरोगी आयुष्य जगा

जर ही लक्षणं तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला जाणवत असतील, तर उद्यापासून नव्हे, आजच आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.

नियमित व्यायाम करा

संतुलित आहार घ्या

धूम्रपान आणि मद्यपान टाळा

तणावमुक्त राहा

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

5 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago