हीवाळ्यात जसं अन्नपचन खूप चांगलं होतं, खाल्लेलं सगळं अंगी लागतं, तसं पावसाळ्यात होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे कित्येक पदार्थ पचत नाही. ज्या लोकांना नेहमीच ॲसिडीटी, अपचन असा त्रास होतो, त्यांनी तर त्यांच्या आहाराची पावसाळ्यात थोडी विशेष काळजी घ्यायला हवी. कारण सर्वसामान्य लोकांनाही या दिवसांत कित्येक पदार्थ खाल्ले की पोट जड होणे, ॲसिडीटी, अपचन असा त्रास होतो.
कच्च्या कांद्याप्रमाणेच वांगी खाणंही या दिवसांत कमी करावं. कारण वांगीही वातूळ असतात. त्यामुळेही अनेकांना पोटदुखी, पोट जड पडणे, असे त्रास होतो. या कारणामुळेच आपल्याकडे आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास पाळतात त्यात कांदा आणि वांगी खाणं बंद केलं जात. या दिवसांत हिरव्या पालेभाज्या खातानाही विशेष काळजी घ्यावी. कारण पालेभाज्यांना चिखल, माती लागलेली असते. त्यात अनेक किटाणू, बॅक्टेरिया असतात. जर भाज्या योग्य पद्धतीने स्वच्छ केल्या नाही तर अपचनाचा त्रास होऊ शकतो.
काकडी, बीट, पत्ताकोबी, गाजर असे पदार्थ एरवी आपण कच्चे खातो. पण पावसाळ्यात ते पचायला जड जातात. त्यामुळे ज्यांना नेहमीच अपचन होते, त्यांनी हे सलाड पावसाळ्यात कधीच कच्चे खाऊ नये. तुपामध्ये थोडेसे फ्राय करून खावे. पावसाळ्याच्या दिवसांत मशरूम खाणेही कमी करावे.
(सोशल मीडियावरून साभार)
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…