वातावरण बदल झाला की, लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. सर्दी खोकला होणं तर कॉमनच आहे. पण एक समस्या सगळ्यात जास्त त्रास देते ती म्हणजे कफ. याने छातीत समस्या होते. हिरवा कफ आल्यावर तर लोक आणखीनच घाबरतात. अशात अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी याबाबत एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी हिरवा कफ असल्यावर अॅंटी बायोटिक घ्यावं की नाही? याबाबत माहिती दिली आहे.
का होतो हिरवा कफ
आपल्या श्वसननलिकेत जेव्हा एखादं इन्फेक्शन किंवा सूज होते, तेव्हा कफ तयार होतो. सामान्यपणे कफाचा रंग पांढरा किंवा हलका पिवळा असतो. पण जेव्हा इन्फेक्शन जास्त होतं तेव्हा कफ हिरवा आणि घट्ट होतो. हिरवा कफ याचा संकेत देतो की, शरीर इन्फेक्शनसोबत लढण्यासाठी पांढऱ्या रक्तपेशी तयार करत आहे.
हिरवा कफ असल्यावर अॅंटी बायोटिक्स गरजेचे
हिरव्या कफाचा अर्थ नेहमीच बॅक्टेरिअल इन्फेक्शन होत नाही. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की, हिरवा कफ झाल्यावर त्यांना अॅंटी-बायोटिक्सची गरज आहे. पण हा मोठा गैरसमज आहे.
जास्तीत जास्त केसेसमध्ये हिरवा कफ वायरसमुळे होतो. जसे की, सर्दी किंवा फ्लू आणि वायरसवर अॅंटी बायोटिक्सचा काहीच प्रभाव होत नाही. अशात केवळ कफाच्या रंगावरून अॅंटी-बायोटिक्स घेण्याचा निर्णय घेणं योग्य नाही.
कफ दूर करण्याचे उपाय
दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
आराम करा आणि शरीराला इन्फेक्शनसोबत लढण्यासाठी वेळ द्या.
हलक्या गरम गोष्टी म्हणजे सूप, आल्याचा चहा, तुळशीचा चहा याने कफ पातळ होतो.
रोज सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे.
(सोशल मीडियावरून साभार)
आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…
मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…
मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…
मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…