महाराष्ट्र

मुंबईतील पावसाळी दुर्घटनांवर सरकारला धारेवर; जबाबदारांवर कारवाईची विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई: मुंबईसह राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याबद्दल काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत तीव्र चिंता व्यक्त केली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या दुर्घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईत मॅनहोलमध्ये पडणे, झाड कोसळणे तसेच मानखुर्द येथील इमारत दुर्घटनेत गेल्या दोन दिवसांत १२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे प्रशासनाची पूर्वतयारी आणि आपत्ती व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण, झाडांची छाटणी, मॅनहोलची सुरक्षितता, जलनिस्सारण व्यवस्था आणि आपत्कालीन नियोजन प्रभावीपणे झाले असते, तर अनेकांचे प्राण वाचले असते, असे त्यांनी नमूद केले.

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने द्रुतगती मार्ग, जुना मुंबई–पुणे महामार्ग आणि घाट विभागातील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून हजारो प्रवासी अडकून पडल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही या प्रकल्पात खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित झाला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

राज्य सरकारने संपूर्ण परिस्थितीबाबत तातडीने अधिकृत निवेदन करून नागरिकांना वस्तुस्थिती, उपाययोजना आणि पुढील नियोजनाची माहिती द्यावी. तसेच सर्व दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व यंत्रणांची जबाबदारी निश्चित करत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

4 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

5 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

8 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

8 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

9 तास ago