आरोग्य

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा

लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतात. लसणाला आयुर्वेदात एक शक्तीशाली वनस्पती मानलं गेलं आहे. कारण आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही कच्चा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, याची तिखट आणि डार्क टेस्टमुळे कच्चा लसूण खाणं अनेकांना अवघड जातं.

लसणातील पोषक तत्व…

लसणांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. जे आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. जे इम्यूनिटी वाढवण्यास मदत करतं. लसणांमध्ये सेलेनियम आढळतं. तसेच यात फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. इतकंच नाही तर यात अ‍ॅंंटी-एजिंग गुणही असतात. ज्यामुळे त्वचा तरूण आणि चमकदार दिसते. लसणामधील अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण शरीरात होणारी वेदना आणि सूज कमी करतात.

लसणाचे आरोग्याला होणारे फायदे…

लसूण नियमितपणे खाल्ल्यास पचनासाठी आवश्यक तत्व वाढतात आणि पचन चांगलं होतं. लसणामुळे भूक वाढते. लसूण खाल्ल्यानं पोटात अॅसिड बनत नाही आणि पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात. जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नसेल टॉयलेटमध्ये खूप वेळ बसावं लागत असेल तर लसणानं ही समस्या दूर होते. शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल आणि हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे लसणामुळे हृदयासंबंधी अनेक आजारांचा धोका कमी होतो. इतकंच नाही तर लसणामुळे शुगर कंट्रोल होते. तसेच शरीरातील अनेक विषारी तत्व बाहेर पडतात.

लसूण भाजून खाण्याचे फायदे…

जर तुम्हाला कच्चा लसूण खाणं अवघड जात असेल किंवा त्याची टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीनं लसूण खाऊ शकता. लसणाच्या काही कळ्या तूपात भाजून खाल्ल्यास बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास अधिक मदत मिळते. तसेच लसूण तूपामध्ये भाजून खाल्ल्यास इम्यूनिटी बूस्ट होते. लसूण तूपात भाजून खाल्ल्यास बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटी दूर होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

5 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

5 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

5 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

6 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

6 तास ago