अनेक लोकांना वेगवेगळ्या कारणांनी रात्री झोप न येण्याची समस्या होते. जास्तीत जास्त लोकांना रात्री झोपेवेळी मनात वेगवेगळे विचार येतात, त्यामुळेही त्यांना झोप लागत नाही. मनात सतत वेगवेगळे विचार झोपेत खोळंबा घालतात. अशात रात्री लवकर झोप येत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी फ्रेशही वाटत नाही. तसेच आजारीही पडू शकता.
डीप ब्रीदिंग…
झोपण्याआधी डीप ब्रीदिंग एक्सरसाईज करून मनात येणार विचार दूर पळवू शकता. मोठा श्वास घेण्याची काही वेळ एक्सरसाईज केली तर मन शांत करण्यास मदत मिळते. सोबतच शरीराला आरामही मिळतो. ही एक्सरसाईज करण्यासाठी हळू श्वास घ्या आणि काही सेकंदासाठी रोखून ठेवा. नंतर श्वास तोंडानं सोडा. ही एक्सरसाईज तुम्ही झोपण्याआधी ५ ते १० मिनिटं करू शकता.
मेडिटेशन…
झोपण्याआधी काही वेळ मेडिटेशन केल्यानंही डोकं शांत करण्यासाठी मदत मिळू शकते. यासाठी डोळे बंद करा आणि श्वासांवर लक्ष केंद्रीत करा. असं ५ ते १० मिनिटं करा. यानं मन शांत होईल आणि चांगली झोपही येईल.
सकारात्मक विचार…
झोपण्याआधी सकारात्मक गोष्टींचा विचार केल्यानं चांगली झोप येण्यास मदत मिळते. तुम्हाला चांगलं वाटत असल्याचं तुमच्या मनाला सांगा. चिंतेच्या गोष्टींचा सतत विचार करू नका. असं केल्यानं मन विचलित होणार नाही.
अंधार आणि शांतता…
झोपतेवेळी रूममध्ये अंधार ठेवा आणि शांतता ठेवा. असं केल्यानं मेंदुला आराम मिळतो. कसलेही आवाज येऊ नये म्हणून कानात रूई लावा. झोपण्याआधी खासकरून निळ्या प्रकाशापासून वाचा. कारण यानं मेलाटोनिनच्या प्रोडक्शनवर प्रभाव पडतो.
पुस्तक वाचा…
तुम्हाला जर रात्री लवकर झोप येत नसेल तर एखादं तुमच्या आवडीचं चांगलं पुस्तक वाचा. यानं डोक्यात विचार येणार नाहीत आणि वाचता वाचता तुम्हाला चांगली झोपही लागेल.
मनातील गोष्टी डायरीत लिहा
जर दिवसभर तुमच्या मनात चिंता राहत असेल, भविष्य आणि भूतकाळातील गोष्टी सतावत असतील तर झोपण्याआधी डायरी लिहिण्याची सवय लावा. असं केल्यानं मनातील गोष्टी बाहेर येतील आणि तुम्हाला शांत वाटेल.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…