आरोग्य

पचनशक्ती वाढवण्याचे साधे आणि सरळ उपाय

(1) सकाळी उठल्यावर नुसता चहा घेऊ नये।त्या सोबत तुमची जी काही न्याहारी असेल ती सोबत खाऊन मगच चहा घ्यावा।

(2) दुपारचे जेवण आणि न्याहारी यात किमान ४ तासांचे अंतर असावे.मध्ये काहीही खाऊ नये

(3) दुपारचे भोजन झाल्यावर ज्यांना शक्य असेल त्यांनी डाव्या कुशीवर २० मिनिट झोपावे।

(4)  सर्वात महत्त्वाचे, जे जेवताना थोडे थोडे पाणी पिणे चालेल,परंतु एकदा जेवण झाले की फक्त घसा ओला करण्यासाठी अगदी एक घोट पाणी घ्यावे। मग मात्र कमीत कमी ४०मिनीट आणि जास्तीतजास्त १तास पाणी पिऊ नये।कारण मग पचनासाठी लागणारा अग्नि विझून जातो,आणि अन्न पचन होत नाही।म्हणजे बघा पेटलेल्या अग्नीवर जर आपण एकदम पाणी ओतले तर कसा क्षणार्धात अग्नी विझतो तसेच आपल्या पोटात होते,वागभट्टांंनी म्हटले आहे की ‘भोजनांंते विषमवारी’ म्हणजे भोजन झाल्यावर पाणी पिणे विषसमान असते.मगअन्न पचनासाठी लागणारी उष्णता पोटाला न मिळाल्याने अन्न कुजते आणि पचन न झालेल्या अन्नाचे रस तसेच रक्तात मिसळून अनेक व्याधी निर्माण होतात।

(5)संध्याकाळी काहीतरी म्हणजेच ४तास झाल्यानंतर काहीतरी पोहे उपमा असे काहीतरी खाणे नाहीतर दुपारचे जेवण ४तासात पचवून पित्त घशाशी यायला सुरुवात होते।आणि आपल्याला वाटते की आपल्याला आम्लपित्त झाले आहे,आणि मग आपण उगाच आम्लपित्तावर औषधे घेत राहतो।एकदा दुपारचे जेवण होऊन ४तास झाले की काही ना काही खाणे आवश्यक आहे।

(6)रात्रीचे जेवण झाल्यानंतर सुद्धा लगेच पाणी न पिता ४०मिनिटे थांबून पाणी प्यावे,वर सांगितल्या प्रमाणे। तुम्ही जेवण झाल्यानंतर ताक प्यालात तर ते मात्र फायदेशीर असते। ते तुम्ही पिऊ शकतात।असे जर जेवणानंतर नियम कायम पाळलेत तर अन्न पचन उत्तम होते। मी स्वतः वरील नियम पाळतो। त्यामुळे मला कित्येक वर्षे आम्लपित्ताचा त्रास कधीच होत नाही।आणि खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होऊन अंगी लागते।आणि शरीर निरोगी राहते

५० वया नंतर, प्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त साखर आणि मीठ असलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, जंक फूड आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ टाळावेत, कारण पचनसंस्था कमकुवत होते आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो, त्याऐवजी फायबर, प्रथिने आणि ताजी फळे-भाज्या खाणे फायदेशीर ठरते.

काय खाऊ नये (50 नंतर):

प्रक्रिया केलेले अन्न: पॅकेज केलेले स्नॅक्स, तयार जेवण, बेकरी उत्पादने ज्यात प्रिझर्व्हेटिव्ह आणि अनावश्यक कॅलरी असतात.

जास्त साखर आणि मीठ असलेले पदार्थ: शीतपेये, मिठाई, प्रक्रिया केलेले सॉस, लोणची

तळलेले पदार्थ: पचायला जड आणि कोलेस्ट्रॉल वाढवणारे.

जंक फूड: बर्गर, पिझ्झा, चिप्स यांसारख्या पदार्थांमुळे वजन वाढते आणि आरोग्य बिघडते.

लाल मांस: जास्त प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

अल्कोहोल आणि जास्त कॅफिन: शरीराला डिहायड्रेट करू शकते.

काय खावे (50 नंतर): फायबरयुक्त पदार्थ: पालेभाज्या, फळे (सफरचंद, पेरू), ओट्स, डाळी, कडधान्ये.

प्रथिनेयुक्त पदार्थ: मासे, अंडी, डाळी, सोयाबीन स्नायूंच्या ताकदीसाठी महत्त्वाचे.

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी: हाडांच्या बळकटीसाठी दुग्धजन्य पदार्थ (दही, दूध).

पाणी: भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

3 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

3 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

3 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

3 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

9 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

9 तास ago