आरोग्य

ओव्याचे काही खास गुणधर्म

गुणधर्म

पाचक, गरम, तिखट, हलका, कडवट, पित्तकारक, वातकारक, रुची वाढविणारा, वेदनाशामक इ.

उपयोग

१) ओवा नेहमी चावूनच खावा.

२) पोटदुखीवर १/२ चमचे ओवा गरम पाण्यासोबत घ्या. लवकर गुण येतो.

३) पचायला जड अन्नपदार्थातून ओवा खा. चांगले पचन होते. (भजी, वडा, इ.)

४) ओवा सकाळी खाल्ल्याने भूक वाढते.

५) रात्री खाल्ल्याने शौचास साफ होते.

६) लघवी जास्त होत असेल तर ओवा गुळासोबत खा. रात्री अंथरूण ओले करणारी लहान मुले असल्यास त्यांना आवश्य द्या.

७) जखम बरी होत नसल्यास ओवा गरम पाण्यात पेस्ट करून लावा.

८) दाढदुखीवर ओवापूड लावा.

९) ओवा चिलमितून ओढल्यास श्वासाचे विकार थांबतात.

१०) पोटातील गँस, सर्दी, खोकला, कफ, ताप, कमी होतो.

११) तयार चहामध्ये ओवा टाकून चहा प्या. चहाचा त्रास होणार नाही.

१२) दूध प्यायल्या नंतर ओवा खाल्ला तर दूध चांगले पचते.

१३) ओवा पावडर ताकातून घेतल्यास पोटातील कृमी नष्ट होतात.

१४) ओवा पावडर + लिंबू रस + तुरटी + ताक मिक्स करून केसांना चोळून लावल्यास उवा, लिखा मरतात. कोंडा कमी होतो.

१५) एक चमचा ओवा + दोन कप पाणी घेऊन उकळवणे व एक कप पाणी करुन जेवणापूर्वी पिणे. लिव्हर ठीक होऊन दा पिण्याची इच्छा कमी होते.

१६) भाजलेला १ ग्राम ओवा पानात टाकून चावा, असे केल्याने अपचनापासुन तात्काळ आराम मिळेल. हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यासाठी थोडासा ओवा चावा आणि यानंतर पाणी पिऊन सेवन करा.

१७) गळ्यात खरखर असेल तर ओवा आणि बोराची पाणे एकत्र उकळा आणि ते पाणी गाळून प्या.

१८) ओवा, चिंचुके आणि गुळ हे समान प्रमाणात घ्या आणि तुपात चांगल्या प्रकारे भाजून घ्या. नपुंसकतेने त्रस्त असलेल्या व्यक्तीला हे नियमित थोड्या प्रमाणात दिल्यास फायदा होतो. हे मिश्रण पौरुषत्त्व वाढवण्या सोबतच शुक्राणुंची संख्या वाढवण्यात मदत करते.

१९) अॅसिडीटीची समस्या असेल तर थोडा ओवा आणि जीरा एकत्र भाजून घ्या. यानंतर हे पाण्यात उकळून घ्या आणि गाळुन घ्या. या गाळलेल्या पाण्यात साखर टाकून प्या, अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.

२०) कॉलरा झाल्यावर कापूर + ओवा एकत्र करुन खा. आराम मिळेल.

२१) झोप न येण्याची समस्या असेल तर 2 ग्राम ओवा पाण्यासोबत सेवन करा. असे केल्याने चांगल्या प्रकारे झोप येईल.

२२) खाज येत असेल किंवा चटका बसला असेल तर त्या ठिकाणी ओव्याची पावडर लावा. 4 ते 5 तास ते तसेच राहू द्या. यामुळे तुम्हाला खुप फायदा होईल.

२३) तोंडाचा दुर्गंध येत असेल किंवा तोंड आले असेल तर रात्री ओव्याचे सेवन करा, तुमची अडचण दूर होईल.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

12 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

12 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

12 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago