आरोग्य

फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड हे ओळखण्याच्या ‘खास’ टिप्स

आरोग्यासाठी लाभदायी असलेली फळे खायला सर्वांनाच आवडतात. विशेषतः उन्हाळ्यात लोकांना हलके अन्न खायला आवडते. म्हणून फळे आणि दही, लस्सी सारख्या थंड पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड, खरबूज, संत्री अशी मुख्य पाच फळं गोड आहेत की आंबट हे कसे तपासायचे ते पाहू.

कारण अनेकदा उत्साहाने फळांची खरेदी होते आणि घरी आल्यावर फळं आंबट, तुरट चवीची लागतात. त्यामुळे फळांची पारख करण्याच्या टिप्स जाणून घेतल्या तर तुमच्या पदरी निराशा येणार नाही आणि फळांची नैसर्गिक गोडी चाखता येईल!

डाळिंब: डाळिंब खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. रक्त वाढवण्यासाठी डाळिंबाला जास्त मागणी असते. मात्र अनेकदा डाळिंब घरी आणून चिरले की ते एवढे पांढरे फटक दिसते की, डाळिंबाला लाल रंग पुरवण्याची गरज आहे की काय असे भासू लागते. म्हणूनच अशी फसवणूक टाळण्यासाठी डाळिंब खरेदी करताना त्याचा शेंडा बघा तो उघडलेला असेल तर डाळिंब लाल आणि गोड असेल आणि शेंडा मिटलेला अर्थात बंद असेल तर ते डाळिंब कमी गोड असू शकते!

खरबूज: टरबूजाप्रमाणेच खरबूज देखील उन्हाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. पण खरबूज खरेदी करताना चूक होऊ नये म्हणून काळजीपूर्वक पहा की खरबूजावर पट्टे असतील आणि ते लांब असेल तर समजून घ्या की ते गोड आहे. पट्टे नसतील तर ते थोडे कच्चे आणि कमी गोड असू शकते.

संत्री: गोड आणि आंबट संत्री खरेदी करण्यासाठी, तुम्हाला त्याच्या देठाची बाजू बघावी लागेल. ती बाजू आत रुतलेली आणि गडद रंगाची असेल तर समजून जा की संत्र आंबट गोड असेल. ते तसेच असायला हवे. अन्यथा ते फिकट रंगाच्या देठाचे असेल तर ते बेचव असू शकते.

ड्रॅगन फ्रुट: बाजारात चढ्या भावाने विकले जाणारे ड्रॅगन फ्रूट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण विकत घेऊनही ते बेचव निघाले तर पैसे वाया जाणार! तसे होऊ नये म्हणून ड्रॅगन फ्रुट खरेदी करताना त्याच्या देठाचा भाग बघा. जर ते ताजे असेल आणि हिरव्या पानांसह असेल तर ते गोड असेल. पण जर ते वाळले तर समजून जा की बेचव असेल.

पपई: हिरवी पपई कच्ची असते, ती चटणी, भाजी करण्यासाठी वापरता येते, पण फळ म्हणून पपई खायची असेल तर ती पूर्णपणे केशरी पिवळी असायला हवी. त्यावर हिरवट झाक असेल तर ती पपई पूर्ण पिकलेली नाही असे लक्षात येते.

टरबूज: बाजारात टरबुजाचे अनेक प्रकार दिसतात. लांबट, गोल, रेघांचे, बिना रेघांचे, शेंडी असलेले, नसलेले! या सगळ्या वेगवेगळ्या प्रजाती असल्या तरी त्याचा गुणधर्म सारखाच आहे. टरबूज विकत घेताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे टरबुजाचा बाह्य रंग! हिरवेगार टरबूज त्यावर पिवळी झाक असेल तर ते टरबूज कृत्रिम रित्या पिकवलेले नसून नैसर्गिक समजावे आणि खाण्यास योग्य आणि सुमधुर आहे हेही लक्षात घ्यावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

14 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

14 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

14 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

14 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

14 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

14 तास ago