शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील वधू-वर! अमेरिकेच्या भुमित निघाला परण्या अन् दुमदुमल्या मंगलाष्टका…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील वधू-वराने अमेरिकेतील डलास शहरात पारंपरिक हिंदू वैदिक पद्धतीने विवाह केला आहे. विवाहप्रसंगी नवदांपत्याने महाराष्ट्रीयन परंपरेनुसार वेशभूषा परिधान केली होती. संगीत, संस्कार आणि नात्यांचा संगम अनुभवताना अमेरिकेच्या भूमीत मराठमोळा उत्सव साजरा झाला. नवदांपत्याला विविध ठिकाणांहून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

चि. सौ. का. ऐश्वर्या विजय लांडे (एम.एस. इन आर्किटेक्चर, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) आणि श्री. विशाल राजाराम सांबरे (एम.एस. इन पॉलिमर इंजिनिअरिंग, रा. निमगाव भोगी, ता. शिरूर) असे विवाहबद्ध झालेल्या दोघांची नावे आहेत. या मंगलप्रसंगी विवाहपूर्व व विवाहाचे सर्व विधी अत्यंत साग्रसंगीत व आनंदमय वातावरणात पार पडले. २० एप्रिल २०२५ रोजी विवाह सोहळ्याची सुरुवात सीमंत पूजन या विधीने झाली. यानंतर २१ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने साखरपुडा सोहळा पार पडला. त्यानंतर पाश्चात्त्य संस्कृतीनुसार रिंग सेरेमनी (Ring Ceremony) उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमानंतर उपस्थित पाहुण्यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीच्या भोजनाचा आस्वाद घेतला.

हळदीचा सोहळा दुपारी २ वाजता पारंपरिक मराठी पद्धतीने साजरा करण्यात आला. सर्व वधूपक्ष व वरपक्षातील महिला-भगिनींनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात हळद लावण्याच्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. सायंकाळी ५.३० वाजता वरराजाची भव्य मिरवणूक (परण्या) काढण्यात आला. यानंतर सायंकाळी ७ वाजता वेदमंत्रांच्या पठणात व मंगलाष्टकांच्या जयघोषात विवाह विधी पार पडला. भव्य अशा आतषबाजीत विवाहसोहळा अधिकच देखणा झाला. यानंतर होम-हवन, सप्तपदी व कन्यादान यांसारखे सर्व धार्मिक विधी नितांत श्रद्धेने व शिस्तबद्धतेने पार पाडण्यात आले.

विवाहप्रसंगी नवदांपत्याने महाराष्ट्रीयन परंपरेनुसार वेशभूषा परिधान केली होती. संगीत, संस्कार आणि नात्यांचा संगम अनुभवताना अमेरिकेच्या भूमीत मराठमोळा उत्सव साजरा झाला. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच अमेरिकास्थित भारतीय व स्थानिक नागरिकांनी या आनंदोत्सवात उपस्थित राहून नवविवाहित दांपत्यास मन:पूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

विवाहानंतरच्या दुसऱ्या दिवशी, दिनांक २२ एप्रिल रोजी सात्यानारायण पूजन व महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण वातावरणात भक्तिभाव, समाधान आणि उत्साह यांचा सुंदर मिलाफ दिसून आला. या सोहळ्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा गौरव पुन्हा एकदा अमेरिकेच्या भूमीत अनुभवता आला असून, मराठमोळ्या परंपरेचा अभिमानही जागविण्यात आला आहे.

शिरूरमध्ये खोटं लग्न करणारी लुटेरी दुल्हनसह टोळी जेरबंद…

लग्न ठरवताना दोघांचा ब्लड ग्रुप एकच असेल तर लग्न करावे की नाही

शिरुर तालुक्यात लग्नाच्या मध्यरात्रीच दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम…

चला साहेब लोक आलेत बिन पगारी अन् फुल अधिकारी; लग्नाला चला…

गर्भधारणेसाठी योग्य वय कोणत

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

16 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

16 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

16 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

16 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

16 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

16 तास ago