मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी निवडणूक सदन येथे बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कु. मायावती यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींशी संवाद साधला.
भारत निवडणूक आयोगाने विविध हितधारकांशी सातत्यपूर्ण व व्यापक संवाद साधण्यावर भर दिला आहे. त्याच अनुषंगाने आयोगाने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकीय पक्षांशी थेट संवाद सुरू केला आहे. या संवादाद्वारे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाध्यक्षांना आपल्या सूचना थेट आयोगापर्यंत पोहोचवता येतील, यासाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.
सर्व संबंधित पक्षांच्या सहकार्याने विद्यमान कायदेशीर चौकटीत राहून निवडणूक प्रक्रियेला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोगाने हा पुढाकार घेतला आहे.
आयोगामार्फत आतापर्यंत ४,७१९ सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये ४० मुख्य निवडणूक अधिकारी, ८०० जिल्हा निवडणूक अधिकारी आणि ३८७९ मतदार नोंदणी अधिकारी यांनी सहभागी होऊन २८ हजारांहून अधिक राजकीय प्रतिनिधींशी संवाद साधला आहे, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…