आरोग्य

डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोका कमी करते पालक भाजी

पालकाची भाजी ही सगळ्यात पौष्टिक भाजी मानली जाते. कारण यात अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. पालकाची भाजी शारीरिक आरोग्यासोबतच आपल्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असते.

१) डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर: पालक भाजीच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. कारण यात अल्फा लिपोइक ॲसिड असतं, जे इन्सुलिन सिक्रीशन वाढवतं.

२) एनर्जी मिळते: पालकमध्ये फायबर, आयर्न आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि याद्वारे शरीराचा थकवा दूर करण्यास मदत मिळते.

३) डोळ्यांसाठी फायदेशीर: पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि लूटिनसारखे महत्वाचे न्यूट्रिएंट्स असतात. जे डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.

४) हाडे होतात मजबूत: पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. हाडांसंबंधी आजारांचा धोकाही कमी होतो.

५) आतड्यांसाठी फायदेशीर: पालक भाजीमध्ये फायबर भरपूर असतं. जे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतं. सोबतच बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.

६) त्वचेसाठी फायदेशीर: पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे त्वचा चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. या तत्वांमुळे त्वचा चमकदार दिसते.

७) वजन नियंत्रित राहत: पालक भाजीमध्ये कॅलरी कमी असतात. त्यामुळे जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांच्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरते.

८) हृदयासाठी फायदेशीर: पालकमध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं, जे हृदयासाठी फायदेशीर असतं. याने हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो.

९) मानसिक आरोग्य चांगलं राहत: पालक भाजीमध्ये फोलेट असतं, जे डिप्रेशन आणि स्ट्रेस लेव्हल कमी करण्यास मदत करतं.

१०) डिटॉक्सिफिकेशन: पालक भाजीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

4 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

4 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

4 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

4 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

5 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

6 तास ago