आरोग्य

फंगल इन्फेक्शनचा त्रास

झपाट्यानं वाढणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन. उन्हाळ्यात त्वचेची आणि स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर ह्या आजाराला तुम्ही निमंत्रण देऊ शकता. हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे तो जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. काही घरगुती उपाय तुम्ही पर्यायी म्हणून करू शकता.

कडुनिंब: कडुनिंब हे बुरशी मारण्यासाठी उत्तम औषध आहे. कडुनिंबाचा पाला आंघोळीच्या गरम पाण्यात टाकावा. त्या पाण्यानं स्वच्छ आंघोळ करावी. कडुनिंबाच्या पानांची पेस्ट फंगल इन्फेक्शन झालेल्या जागी लावावी. रोज दोन कोवळी पानं खावी. त्यामुळे पोट साफ होत.

तुरटी: फंगल इन्फेक्शनमध्ये सर्वात गुणकारी औषध म्हणजे तुरटी. तुरटीचं पाणी इन्फेक्शन झालेल्या जागी लावावं ते पुसून टाकू नये. आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवावी.

लसूण: अ‍ॅन्टीफंगल म्हणून लसूण काम करतं. ऑलिव्ह ऑइलमध्ये लसणीच्या पाकळ्यांचा रस काढून ते तेल लावावं.

कोरफड: कोरफडीचा गर काढून तो फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावावा. त्यामुळे खाज सुटणार नाही. त्वचेची आग होणार नाही. कोणताही साबण किंवा केमिकल असलेल्या क्रीम त्वचेवर लावू नका.

खोबरेल तेल: शुद्ध खोबरेल तेल फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावून मालिश करावी. दालचिनीचं तेल आणि खोबरेल तेल दोन्ही समप्रमाणात घेऊन लावावं. मात्र सगळ्या प्रकारच्या फंगल इन्फेक्शनला चालेल असं नाही त्यामुळे डॉक्टरांनी तेल लावू नये असं सांगितलं असेल तर डॉक्टरांचा सल्ला पाळावा.

स्वच्छ कोमट पाण्यानं दिवसातून दोन वेळा आंघोळ करा. कपडे स्वच्छ उन्हात सुकवा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कपड्याला इस्त्री करा. त्यामुळे कपड्यावरील फंगलचे विषाणू मरण्यास मदत होईल. फंगल इन्फेक्शनचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे तातडीनं डॉक्टरला दाखवून योग्य ते उपचार सुरू करावेत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जलद गतीच्या व्यायामांमुळे रक्तातील साखर वाढू शकते?

चालणे, योगासन करणे आणि जास्त हालचालींचे बहुतेक प्रकार शरीराला ग्लुकोजचे चांगले नियमन करण्यास मदत करतात.…

1 तास ago

घरच्या घरी ब्लड प्रेशर कसे तपासावे

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे आणि आहाराकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत…

1 तास ago

मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते? तुम्हालाही स्ट्रेस छळतोय ना, वाचा ४ सोपे उपाय

आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे.…

15 तास ago

पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाणी हे संपूर्ण आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला…

15 तास ago

थापाडे कोण, हे महाराष्ट्राला ठाऊक! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

अमित शाह यांच्यावरील टीकेला शिंदेंचे प्रत्युत्तर; शेतकरी प्रश्नांवरूनही विरोधकांना सुनावले मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…

15 तास ago

सात दशकांच्या अभिनय प्रवासातील आठवणींना उजाळा; ‘चित्रपताका’मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंच्या गप्पांनी रंगली मैफल!

‘क्वीन ऑफ द कॉमेडी... गप्पा शुभा खोटेंशी!’ या विशेष मुलाखतीत उलगडला हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ; मेहमूद,…

15 तास ago