माेहरीचं तेल आणि हिंग यांचा एकत्रित वापर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. पचनापासून ते केसांची वाढ चांगली होण्यापर्यंत त्याचे कित्येक वेगवेगळे उपयोग आहेत
मोहरीचं तेल आणि हिंग एकत्रित करून स्वयंपाकात वापरल्याने पचनाशी संबंधित त्रास कमी होऊ शकतात. फोडणीसाठी मोहरीचं तेल वापरणे आणि त्यामध्ये चिमूटभर हिंग घालणे असा एक उपाय तुम्ही करू शकता.
मोहरीचं तेल थोडं कोमट करावे आणि त्यात हिंग घालून डोक्याला मालिश करावी. यामुळे त्वचेखालील रक्ताभिसरण सुरळीत होऊन केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते. त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी होतं.
मोहरीच्या तेलात चिमूटभर हिंग घालून त्वचेला मालिश केल्यास त्वचा चमकदार होते. पण असं करताना आधी पॅचटेस्ट जरूर घ्यावी.
सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठीही मोहरीचं तेल आणि हिंग हे मिश्रण खूप उपयुक्त ठरतं. यासाठी सुरुवातीला मोहरीचं तेल थोडं गरम करून घ्यावं आणि नंतर त्यामध्ये हिंग घालावा.
डोकं खूप दुखत असेल तर मोहरीच्या तेलात हिंग घालून डोक्याला मालिश करा. डोकेदुखी थांबेल.
(सोशल मीडियावरून साभार)
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ४ लाख २५…
शिरूर (तेजस फडके) : आगामी दिपावळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरुर शहरातील नागरिक, व्यापारी आणि सराफ व्यावसायिकांच्या…
मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…
गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…