आरोग्य

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे दूषित होतं. त्यामुळे पावसाळ्यात डायरिया (diarrhoea) किंवा कॉलरा (cholera) होण्याचा धोका वाडतो. अशात वेळीच काही गोष्टींची काळजी घेतली तर डॉक्टरांकडे जाण्याची आणि पैसे खर्च करण्याची वेळ येणार नाही. डायरिया आणि कॉलरासारख्या आजाराच्या मुख्य कारणात अस्वच्छता असतं. त्यामुळे या दिवसात स्वच्छतेवर अधिक भर द्यावा लागतो.

हात चांगले स्वच्छ ठेवा

डायरिया किंवा इतरही आजारांपासून बचाव करण्यासाठी सगळ्यात गरजेचं आहे ते हात चांगले धुणं. यासाठी जेवणाआधी हात साबणानं आणि पाण्यानं कमीत कमी २० सेकंद धुवावे. हात धुतल्यानं डायरियासाठी जबाबदार कीटाणू मरतात आणि तुम्ही सुरक्षित राहता.

स्वच्छ पाणी प्या

पावसाळ्यात डायरिया आणि जुलाब होण्याच्या मुख्य कारणात पाणी असतं. दूषित पाणी तुम्हाला काही दिवसांसाठी आजारी पाडू शकतं. त्यामुळे पाणी स्वच्छ प्या. शक्य झाल्यास पाणी उकडून आणि थंड करून प्या.

फळं आणि भाज्या चांगल्या स्वच्छ करा

या दिवसांमध्ये घरात आणलेली फळं आणि भाज्या धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करा. कापलेली फळं आणि भाज्या जास्त वेळ उघड्यावर ठेवू नका.

ताजं जेवण करा

पावसाळ्यात पोटासंबंधी समस्या खूप जास्त होतात. त्यामुळे ताजं आणि गरम अन्न खा. अन्न उघड्यावर ठेवू नका. भांडी स्वच्छ ठेवा.

बाहेरचं खाणं टाळा

हॉटेल, ठेले किंवा स्टॉलवर या दिवसात स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात नाही. माशा आणि डास भरपूर वाढतात. अशात बाहेरचं खाऊन तुम्हाला डायरियाचा धोका होऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago