शिरूर तालुका

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीला तीन दिवसांच्या पाठलागानंतर चाकण येथून ताब्यात घेण्यात आले.

8 जुलै 2021 रोजी बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी वाहतूक व साठवणूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकून सुमारे 78 लाख रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी 9 जुलै 2021 रोजी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते याच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा घडला त्यावेळी गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक असलेला प्रवीण गवते (वय 22, रा. गवते वस्ती, चाकण, ता. खेड) हा गुन्हा दाखल होताच फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा वारंवार शोध घेतला, मात्र तो सतत ठिकाणे बदलत असल्याने अटकेपासून बचाव करत होता.

फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. दरम्यान, आरोपी चाकण परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि स्थानिक स्त्रोतांच्या मदतीने तीन दिवस सापळा रचून त्याचा पाठलाग केला. अखेर गवते वस्ती, चाकण येथून त्याला ताब्यात घेण्यात यश आले.

पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीच्या अटकेमुळे गुटखा तस्करीविरोधातील कारवाईला बळ मिळाले असून, आरोपीची सध्या सखोल चौकशी सुरू आहे. या गुन्ह्याशी संबंधित आर्थिक व्यवहार तसेच इतर आरोपींच्या नेटवर्कचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह के., अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, सोमनाथ कचरे, पोलीस अंमलदार गणेश येळवंडे, नवनाथ केंद्रे आणि मयूर कुंभार यांच्या पथकाने केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago