आरोग्य

पावसाळ्यातील या ५ भाज्या चुकूनही खाऊ नका

पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या आहारामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाब आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात. पोटाचे आरोग्य बिघडून अपचनाचा त्रासही होतो.

पावसाळ्यात आपल्याला उघड्यावरचे अन्न खाण्यास मनाई केली जाते. या ऋतूमध्ये माश्या आणि डासांची संख्या अधिक प्रमाणात वाढते. परंतु अनेकदा आपण घरातही असे अनेक अन्नपदार्थ खातो. ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात बाजारात अनेक रानभाज्यांची चव चाखायला मिळते. परंतु या काळात अशा अनेक भाज्या आहेत ज्या खाऊ नये.यामुळे आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. पाहूया कोणत्या भाज्या खाऊ नये.

1) पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाऊ नका. यामध्ये पालक, मेथी, फ्लॉवर, कोबीसारख्या भाज्या खाणे टाळा. या ऋतूमध्ये चिखल, कीटक आणि ओलावा असतो. ज्यामुळे भाज्या लवकर संक्रमित होतात.आपण या भाज्या कितीही स्वच्छ पाण्याने धुतल्या तरी आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक जास्त असते.

2) मशरुम हे शरीरासाठी पौष्टिक असले तरी पावसाळ्यात खाऊ नका. याचे सेवन करणे धोकादायक ठरु शकते. पावसाळ्यात भरपूर ओलावा असतो. ज्यामुळे मशरुम खूप लवकर खराब होतात आणि कुजतात. यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. पावसाळ्यात मशरुम खूप काळजीपूर्वक खा.

3) ब्रोकोली या क्रूसिफेरस या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असल्या तरी पावसाळ्यात खाणे टाळायला हवे. यामुळे आरोग्य बिघडू शकते. पावसाळ्यात ओलावा आणि कीटक सहजपणे यामध्ये अडकतात. या कीटकांना स्वच्छ करणे कठीण होते. या भाज्या योग्यपद्धतीने शिजवल्या नाहीतर पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो.

4) पावसाळ्यात वांगी खाणे टाळायला हवा. ही भाजी चविष्ट आणि पौष्टिकतेने समृद्ध असते. पावसाळ्यात ही भाज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. पावसाळ्यात ओलावा आणि मातीमुळे वांग्यांमध्ये लवकर किड लागते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago