आरोग्य

३० वयानंतर डायबिटीस झाल्यावर दिसतात ही ३ लक्षणं, डोळ्यांपासून होते सुरूवात

 

डायबिटीस हा आजार देशात वेगाने वाढत आहे. हा एक लाइफस्टाईल संबंधित आजार असून देशात रूग्णांची वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे. डायबिटीस आजाराला सायलेंट किलर म्हटलं जातं. कारण हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी रूग्णांना आयुष्यभर मेहनत करावी लागते. डायबिटीस रूग्णांना शरीराला हळूहळू आजारी करतो आणि कमजोर करतो.

धक्कादायक बाब म्हणजे डायबिटीसच्या रूग्णांमध्ये किडनी खराब होणे, डोळ्यांसंबंधी समस्या होणे आणि हृदयरोगांचा धोका होणे अशा समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. तसेच पायांच्या नसांमध्ये वेदना, त्वचेसंबंधी समस्यांसाठीही डायबिटीस कारणीभूत असतो.

डायबिटीस या आजारावर कोणताही ठोस उपाय नाहीये. हा आजार केवळ नियंत्रित ठेवला जाऊ शकतो. ज्यासाठी रूग्णाला खूप काळजी घ्यावी लागते. अशात २५ ते ३० वयात हा आजार झाल्यावर कोणत्या समस्या होतात किंवा त्याची काय लक्षणे हे दिसतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला वेळीच योग्य ते उपचार घेता येतील.

३० वयात डायबिटीसची लक्षण

डोळ्यांची समस्या

हाय ब्लड शुगर लेव्हल किंवा डायबिटीस झाल्यावर डोळ्यांचं नुकसान होतं. शुगरच्या आजारात शरीरातील नसा डॅमेज होतात आणि कमजोर होतात. या कारणाने नसांमधील ब्लड सप्लाय स्लो होतो. डोळ्यांमध्येही ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित न झाल्याने रेटिनावर प्रभाव पडतो. यामुळे डायबिटीस रेटिननोपॅथीचा धोका वाढतो. त्याशिवाय रेटिनाचा मुख्य भाग मॅक्यूलामध्येही सूज वाढते. ज्यामुळे डोळ्यांसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. धुसर दिसणे, बारीक अक्षर वाचण्यात अडचण, डोळ्यांमध्ये डाग, डोळ्यात चिरटपणा इत्यादी समस्या होतात.

पुन्हा पुन्हा तहान लागणं

कोणत्याही वयात डायबिटीस झाल्यावर सगळ्यात आधी जे लक्षण दिसतं ते म्हणजे पुन्हा पुन्हा तहान लागणं. भरपूर पाणी प्यायल्यानंतरही तहान भागत नाही आणि सतत पाणी पिण्याची ईच्छा होते. अनेकदा खूप जास्त पाणी प्यायल्यानं पोटदुखी आणि पोटात जडपणा जाणवतो.

पुन्हा पुन्हा लघवी लागण

डायबिटीसच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागणं याचीही समावेश आहे. खूप जास्त पाणी प्यायल्याने शरीरात लघवीचं निर्माण अधिक प्रमाणात होतं. याच कारणाने डायबिटीसच्या रूग्णांना पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागतं. तसेच लघवीचा रंगही गर्द होण्यासारखं लक्षणं डायबिटीसच्या रूग्णांमध्ये दिसतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

54 मिनिटे ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

3 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

21 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago