आरोग्य

या 4 कारणांमुळं रात्री सतत लघवीला येण्याची समस्या उद्भवते, जाणून घ्या

अनेकजण असे आहेत ज्यांना रात्री सतत लघवीला येण्याचा त्रास असतो. यामुळं अनेकदा झोपही मोड होते. विशेष करून महिलांना हा त्रास जास्त जाणवतो.

1) डायबिटीज: जर तुम्हाला डायबिटीज असेल तर यामुळंही सतत लघवीला येते. रक्तात साखरेचं प्रमाण जास्त असल्यानं शरीरात मूत्र तयार होण्याचं प्रमाण वाढतं. यामुळं सतत लघवीला लागण्याचं प्रमाण वाढतं. जर तुम्हाला असा त्रास जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

2) रात्री मद्यापान करण: झोपण्याच्या आधी मद्यापान किंवा मादक पदार्थांचं सेवन केल्यानंही रात्री सतत लघवीला येते. झोपण्याच्या किमान 3 तास आधी तुम्ही मद्यपान करणं किंवा अशा पदार्थांचं सेवन करणं टाळायला हवं.

3) हार्मोन्सचा अभाव: जर शरीरात अँटीडायुरेटीक हार्मोन्सची कमतरता असेल तरीदेखील ही समस्या उद्भवते. द्रव पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे हार्मोन्स किडनीला मदत करतात. म्हणून जर अशा हार्मोन्सची शरीरात कमतरता निर्माण झाली असेल तर सतत लघवीला येण्याची समस्या येते. म्हणून या समस्येला हलक्यात न घेता डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार घेतले पाहिजेत. असं न केल्यास मोठा आजारही होऊ शकतो.

4) पाण्याचे अतिसेवन: झोपण्यापूर्वी जर तुम्ही जास्त प्रमाणात पाण्याचं सेवन केलं तर मध्यरात्री तुम्हाला ही समस्या जाणवू शकते. नेमकं पाणी कधी प्यावं हे माहित नसल्यानं असं होतं. झोपण्याच्या किमान 1 तास आधी पाणी पिऊ नये.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

10 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

15 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

16 तास ago