आरोग्य

हे ५ पदार्थ वाढवतात कफाचे प्रमाण…

कफ झाला की एक वेळ खोकला परवडला पण कफ नको. असं म्हणायची वेळ येते. कारण सतत ठसका लागत राहतो. धास लागत राहते. कफ जाता जात नाही. डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतले तरी परत येतो. त्याची काही कारणे आहेत. ती कारणे म्हणजे आपण खातो ते अन्न. काही पदार्थ कफ वाढवतात. असे पदार्थ पौष्टिकही असू शकतात. पण ज्यांना वारंवार कफाचा त्रास होतो. त्यांनी असे पदार्थ टाळणेच योग्य. असे पाच पदार्थ आहेत ज्यांचे आपण सतत सेवन करतो. आणि त्यामुळे कफ वाढतो.

हे 5 पदार्थ खाऊ नयेत

१) दही शरीरासाठी चांगले असले तरी ते थंड असते. ज्यांना वारंवार सर्दी, खोकला , कफ होतो अशा लोकांनी दही खाणे टाळा.

२) अनेकांना तिखट पदार्थ खाण्याची आवड असते. पण तिखट पदार्थांमुळे घशाला त्रास होतो. त्यामुळे कफ, खोकला होतो. तिखट पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करा.

३) गार पेये प्यायला सगळ्यांनाच आवडतात. पण गार पेये घशासाठी चांगली नाहीत. त्यांच्यामुळे कफच नाही तर सर्दी, खोकलाही वाढतो.

४) तळलेल्या पदार्थांमुळे हमखास कफ वाढतो. असे पदार्थ स्वास्थ्यासाठीही चांगले नाहीत. पदार्थ तळण्यापेक्षा कमी तेलात शॅलो फ्राय करा.

५) कोणत्याही प्रक्रियेतून गेलेले अन्न म्हणजेच पॅकेट फूड घशासाठी चांगले नाही. त्यात भरपूर रसायनयुक्त मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह असतात. असे पदार्थ खाणे टाळा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

7 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

11 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

11 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

11 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

11 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

12 तास ago