आरोग्य

गुडघे दुखीवर ‘हे’ आहेत घरगुती उपाय

वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये निरनिराळे बदल होत असतात. यामध्ये पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी इत्यादी समस्यांचाही आपल्याला सामना करावा लागण्याची शक्यता असते. पण हल्ली तरुण वर्गामध्येही गुडघेदुखीचे प्रमाण वाढत आहे. शारीरिक वेदनांवर वेळीच उपाय करणं आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. गुडघ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरगुती उपाय देखील करू शकता.

गुडघे दुखीवर घरगुती उपाय

1) आयुर्वेदिक उपचारांमध्ये हळदीला भरपूर महत्त्व आहे. हळदीचे दूध प्यायल्यास तुम्हाला गुडघेदुखी आणि असह्य वेदनेपासून देखील आराम मिळेल. हळदीच्या दुधाला ‘गोल्डन मिल्क’ असेही म्हटलं जातं. या घरगुती उपायामुळे आपले शरीर देखील मजबूत राहण्यास मदत मिळते.

2) गुडघेदुखीचा त्रास उद्भवल्यास गुडघ्यांना कोरफड जेल लावून हलक्या हाताने मसाज करावा. या जेलमधील पोषण तत्त्व त्वचेच्या रोमछिद्रांद्वारे शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचतात आणि आपल्याला आराम देण्याचे कार्य करतात.

3) खोबरं खारीक आणि गुळचे मिश्रण करुन रोज खाल्ल्यास आपल्याला कधीच गुडघेदुखी अशाप्रकारचे आजार होणार नाही.

4) थंड पाण्याने गुडघे शेकणे हा उपाय फार जुना आहे. यामुळे रक्त वाहिन्यांना आलेली सूज कमी होईल आणि तसंच त्या भागातील रक्तप्रवाह देखील सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळेल. या सोप्या उपचारामुळे गुडघेदुखीचा त्रास कमी होईल.

5) आल्याचा रस, एक लिंबू आणि अर्धा चमचा मध एकत्र करून रस तयार करा आणि प्या. तसंच आल्याच्या तेलाने तुम्ही आपल्या गुडघ्यांचा मसाज देखील करू शकता. या नैसर्गिक उपायामुळे गुडघ्यांचे दुखणे कमी होण्यास मदत मिळू शकते.

6) तुम्हाला सांधेदुखी किंवा गुडघेदुखी फार जास्त असेल अशांनी तर व्यायाम हा करायलाच हवा. पायांचा व्यायाम करताना नेमका तो कसा करावा याचे योग्य मार्गदर्शनही तुम्ही घ्यायला हवे. यासाठी जीम किंवा एखादा असा कोर्स लावा ज्यामध्ये तुम्हाला गुडघ्यांच्या उत्तम व्यायाम करुन घेण्यास मदत करेल.

7) दालचिनी, आलं, डिंक पावडर तिळाच्या तेलात कालवून तो लेप दिवसातून एकदा दुखऱ्या गुढघ्यावर लावला तर बराच फरक पडतो.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

6 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

1 आठवडा ago